सातारा: सध्याच्या दुष्काळी भागातील शेतकरीही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीतून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकरी जालिंदर सोळसकर हे ढोबळी मिरचीच्या (शिमला मिरची) शेतीतून लाखोंची कमाई करत आहे. कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे त्यांनी 2 एकर शेतीतून तब्बल 75 लाखांचे उत्पन्न घेतले आहे. सोळशकर यांची ही शेती दुष्काळी भागातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणा ठरत आहे.
advertisement
दुष्काळी गावात शेतकऱ्याची कमाल
कोरेगाव तालुक्यातील सोळशी परिसराची दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे. या परिसरात पिण्यासाठी पुरेसं पाणी नाही तर शेतीसाठी पाणी कुठून आणणार? अशी स्थिती आहे. पण येथील शेतकरी जालिंदर सोळसकर यांनी आधुनिक शेतीची कास धरली. शेती आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यांनी तरकारी पिकांची शेती केली. यामध्ये त्यांना चांगला नफा मिळाला आहे.
शिमला मिरचीची लागवड
जालिंदर सोळसकर यांनी ड्रीप इरिगेशनचा वापर करून ढोबळी मिरची लागवड केली. पेपर मिलिशन, स्टेजिंग करून कमी पाण्यात पीक नियोजन केले. ढोबळी मिरचीची लागवड करून 5 महिने झाले. 5 महिन्यांमध्ये 13 वेळा तोडणी झाली आहे. जवळपास एका तोडणी मध्ये तब्बल 13 टन माल निघाला. आतापर्यंत 150 टन मालाची तोडणी करून ती विक्री देखील केल्याचे सोळसकर सांगतात.
कसं केलं नियोजन?
ढोबळी मिरचीचा प्लॉट हा प्रामुख्याने दोन ते तीन महिने चालतो. मात्र, साळसर सांगतात की त्यांचा प्लॉट 8 महिने चालवणार आहे. या ढोबळी मिरचीची लागवड करताना योग्य काळजी घेतली. सेकिंग, भुरी, यांसारखे कोणतीही हानी होणार नाही यासाठी वेळोवेळी औषध फवारणी केली. उन्हाळ्यामध्ये त्याचबरोबर थंडीमध्ये पिकाला कोणती इजा होऊ नये याची काळजी घेत यासाठी ऍग्रो सेल्फ, ॲग्रो मॅजिक या केमिकलचा वापर केला. त्या जोडीला हर्बल केमिकलचा वापर देखील कमी प्रमाणात केला गेला आहे. त्यामुळे दोन एकर मध्ये 150 टनाहून अधिक माल त्यांनी काढला आहे.
6 फुटांचा सोन्या दिवसाला कमावतोय 10 हजार, बैलाच्या किमतीत येईल मर्सिडीज, Video
किती मिळालं उत्पन्न?
2 एकरामध्ये घेतलेल्या ढोबळी मिरचीचा दर हा 60 रुपये तर कधी 70 रुपये किलो असा होता. आजचा भाव धरला तर 40 ते 45 रुपये किलो एवढा आहे. या सर्वाची सरासरी पकडून दर 50 रुपये एवढा धरला तर आतापर्यंत 75 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. या मिरचीच्या लागवडीचा खर्च 10 लाख रुपये झाला आहे. त्यामुळे 2 एकरात 65 लाख रुपये निव्वळ नफा या मिरचीच्या लागवडीमुळे मिळाल्याचे सोळसकर यांनी सांगितले.