सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी फलटण तालुक्यातील धुमाळवाडी गावामध्ये फळ बागेची लागवड केली जाते. याच गावाला फळांचे गाव म्हणून देखील महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ओळखले जाते. डोंगर कपारीच्या मध्यभागी हे गाव वसलेले आहे. या गावाची शेतजमीन फळ लागवड करण्यासाठी उत्तम आहे. धुमाळवाडी गावातील प्रगतशील शेतकरी संजय धुमाळ हे गेले अनेक वर्ष आपल्या शेतात वेगवेगळ्या फळबागेची लागवड करत आहेत. त्यांनी आपल्या चार एकर क्षेत्रामध्ये 1500 ते 1600 गोल्डन सीताफळ झाडांची लागवड केली आहे. यामधून वर्षाला 25 लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळत आहे.
advertisement
कशी केली शेती?
संजय धुमाळ यांनी आपल्या चार एकर क्षेत्रामध्ये 1500 ते 1600 गोल्डन सीताफळाची लागवड केली आहे. आठ ते नऊ दिवस टिकून सुद्धा हे सिताफळ चांगलं राहत असल्यामुळे, या गोल्डन जातीच्या सीताफळाची विक्री त्यांच्या शेताच्या बांधावरून होत असल्याचे ते सांगतात. रसायनमुक्त सिताफळाची लागवड केल्यामुळे सीताफळाला मोठी मागणी बाजारात तयार झाली आहे.
पशुपालकांसाठी महत्त्वाची बातमी! मान्सूनच्या आगमनापूर्वी करा हे महत्त्वाचे काम, अन्यथा...
गोल्डन जातीच्या सीताफळाच्या फळाला फर्म बॅग लावून सीताफळाची काळजी घेतली जाते. सीताफळावर कोणता डाग किंवा खराब होऊ नये यासाठीही फर्म बॅगिंग केले जाते. सीताफळाची क्वालिटी बघून परराज्यातून देखील व्यापारी फलटण तालुक्यातील धुमाळवाडी गावात येत असतात. महाराष्ट्रासह, कलकत्ता, दिल्ली, हैदराबाद, तामिळनाडू येथील व्यापारी येऊन सिताफळ शेतातून ते घेऊन जातात. एकरी 6 ते 7 टनाहून अधिकच उत्पादन सीतफळाचं होतं. सरासरी 90 ते 110 रुपयेपर्यंत सीताफळाला दर मिळतो. वर्षाअखेर यामधून 25 लाख रुपये एवढं उत्पादन मिळतं, असं शेतकरी संजय धुमाळ सांगतात.
एका देशी गाईपासून महिन्याला 30 हजारांची कमाई, शेतकऱ्यानं कसं केलं नियोजन?
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. याच दुष्काळी भागात शेतकरी विविध प्रयोग करताना पाहायला मिळत आहेत. गेले अनेक वर्षांपासून धुमाळवाडी गावामध्ये डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जात होती. याच डाळिंबाच्या शेतीला फाटा देत गावातील शेतकऱ्यांनी आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 29 फळबागा लागवडीचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे उत्पादन या फळबाग लागवडी मधून घेत आहेत. या लागवडीमुळे धुमाळवाडी गावाला फळांचे गाव म्हणून देखील ओळखले जाऊ लागले. ज्या गावात राहण्यासाठी झोपडी होती त्याच गावात आता दोन मजली सिमेंटची घरे बांधली गेली आहेत. हे फक्त आणि फक्त फळबाग लागवडीमुळेच शक्य करू शकले अस देखील प्रगतशील शेतकरी सांगत आहेत.