TRENDING:

Three Day Workweek: सगळच काही बदलणार, नवा वर्क फॉर्म्युला; आठवड्यातून फक्त 3 दिवस काम, CEOचे मोठे भाकीत

Last Updated:

Three Day Workweek: एआयमुळे कामाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार असून आठवड्यात फक्त तीन दिवसांचा वर्क वीक प्रत्यक्षात येऊ शकतो, असे झूमचे सीईओ एरिक युआन यांचे भाकीत आहे. बिल गेट्स, जेन्सेन हुआंग आणि जेमी डिमॉन यांच्यासारख्या दिग्गजांनीही याला समर्थन दिले आहे.

advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली: भविष्यात कामाचे स्वरुप कदाचित आपण विचार करतो त्यापेक्षा वेगळे आणि लहान होणार आहे. झूमचे (Zoom) मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक युआन यांनी एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मुळे भविष्यात तीन दिवसांचा कामाचा आठवडा प्रत्यक्षात येऊ शकतो, असे भाकीत केले आहे. विशेष म्हणजे युआन यांच्यासोबत तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील बिल गेट्स, एनव्हिडियाचे जेन्सेन हुआंग आणि जेपी मॉर्गन चेसचे सीईओ जेमी डिमॉन यांनी देखील असेच भाकीत केले आहे.

advertisement

'न्यूयॉर्क टाइम्स'ला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत युआन यांनी सांगितले की, ‘एआय’च्या जलद प्रगतीमुळे उत्पादकतेत मोठे बदल होतील आणि जी कामे पूर्ण करायला अनेक दिवस लागत होते, ती आता काही तासांत पूर्ण होतील. तुम्हीएआय’चा वापर केल्यास, कमी प्रयत्नांतही तुम्ही तेच परिणाम मिळवू शकता, असे युआन म्हणाले. त्यांची ही मते बिल गेट्स आणि जेन्सेन हुआंग यांच्या मतांशी जुळणारी आहेत. कारण या दोघांनीएआय’मुळे पारंपरिक पाच दिवसांच्या कामाच्या वेळापत्रकाची गरज कमी होईल, असे सुचवले आहे.

advertisement

युआन यांचे हे वक्तव्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विचारसरणीत होत असलेल्या मोठ्या बदलाकडे इशारा करत आहेत. त्यांच्या मते, ‘एआय’ केवळ कामांना स्वयंचलित (automate) करणार नाही, तर कामाच्या रचनेतही बदल घडवून आणेल. एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांनी अलीकडेच सांगितले होते की, ‘एआय’ "कंटाळवाणे काम काढून टाकेल," तर जेमी डिमॉन यांनी असे म्हटले आहे की- ‘एआय’मुळे होणाऱ्या तांत्रिक प्रगतीमुळे भविष्यातील पिढ्यांना आठवड्यातून फक्त तीन दिवसच काम करावे लागेल.

advertisement

सध्या कंपनीएआय’-शक्तीवर चालणाऱ्या नवीन वैशिष्ट्यांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे, जसे की मीटिंगचे रिअल-टाइम सारांश (real-time meeting summaries) आणि स्मार्ट शेड्युलिंग असिस्टंट्स (smart scheduling assistants). ही सर्व साधने कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी डिझाइन केली आहेत.

advertisement

नवीन व्याख्या

तीन दिवसांच्या कामाचा आठवडा ऐकायला स्वप्नवत वाटत असला, तरी युआन यांनी यासाठी सांस्कृतिक बदल आणि विचारपूर्वक अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचे सांगितले. आपण उत्पादकता कशी मोजतो, याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या मते, ‘एआय’च्या युगात यश मोजण्यासाठी कामाचे तास नव्हे, तर कामाचा आउटपुट आणि त्याचा प्रभाव यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

'एआय'ची साधने दैनंदिन कामात अधिक वापरले जात आहेत. आता चर्चेचा विषय 'ऑटोमेशनमुळे निर्माण होणारी चिंता' नसून 'जीवनशैलीतील बदल' हा बनत आहे. युआन आणि त्यांच्यासारखे इतरांनी केलेले भाकीत बरोबर ठरले तर ‘एआय’च्या मदतीने पुढील पिढीतील कामगारांना कामातून अधिक वेळ मिळेल.

मराठी बातम्या/मनी/
Three Day Workweek: सगळच काही बदलणार, नवा वर्क फॉर्म्युला; आठवड्यातून फक्त 3 दिवस काम, CEOचे मोठे भाकीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल