मिड आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक धोक्याची
नुकत्याच झालेल्या IFA Galaxy 2025 परिषदेत बोलताना नरेन यांनी सांगितले की, मिड आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक मोठ्या जोखमीची ठरू शकते. त्यांच्या मते हे शेअर्स सध्या खूप महाग झाले असून बाजारात मोठी अस्थिरता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यामधून पैसे काढणे अधिक सुरक्षित ठरेल.
advertisement
2008 नंतरचा सर्वात धोकादायक काळ?
नरेन यांच्या मते, 2008-2010 नंतर 2025 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक धोकादायक असू शकते.पूर्वी बँका आणि मोठ्या कंपन्या जोखीम घेत होत्या.मात्र आता गुंतवणूकदार थेट शेअर बाजारात पैसे गुंतवत आहेत. अनेक कंपन्या बँकांकडून कर्ज घेण्याऐवजी गुंतवणूकदारांकडून थेट पैसे उभे करत आहेत.यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता येण्याची शक्यता आहे.
Share Market: फेब्रुवारी महिन्यात होणार हाहाकार, लाखो लोक सगळं काही गमावतील; कोणी केली भविष्यवाणी?
SIP कायम फायदेशीर असेलच असे नाही!
गुंतवणुकीसाठी SIP उत्तम पर्याय मानला जातो. मात्र नरेन यांच्या मते SIP मधूनही यावेळी चांगले रिटर्न मिळतीलच याची खात्री नाही. त्यांनी स्पष्ट केले की, SIP फक्त अस्थिर आणि कमी किमतीच्या मार्केटसाठी उपयुक्त असतो. सध्या मिड आणि स्मॉल-कॅप शेअर्सचे P/E रेशो 43x वर पोहोचला असून जो बाजारातील अस्थिरता दर्शवते.
पैसा कोठे गुंतवायचा?
नरेन यांनी मिड आणि स्मॉल-कॅपमधील SIP पेक्षा हायब्रिड फंड्स निवडण्याचा सल्ला दिला आहे. जर बाजाराबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असेल तर इक्विटी-डेट हायब्रिड फंड हा उत्तम पर्याय आहे. कमी जोखीम घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मल्टी-ऍसेट फंड, विशेषतः गोल्ड असलेले फंड अधिक चांगले पर्याय ठरू शकतात.
योग्य निर्णय घ्या!
गुंतवणूकदारांनी या इशाऱ्याची दखल घेणे आवश्यक आहे. 2025 मध्ये मोठ्या अस्थिरतेची शक्यता असल्याने योग्य वेळी गुंतवणुकीचा आढावा घेणे आणि अधिक सुरक्षित पर्याय निवडणे गरजेचे आहे.