भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, पोंगे, वटाणे, सूर्यफूल बी विकून त्या पैसे कमावतात. गेल्या चार पिढ्यांपासून त्या हाच व्यवसाय करत आहेत. बाजारात फुटाणे, शेंगदाणे विक्री करून त्या आपले घर चालवतात. आपल्या मुलांचा सांभाळ आणि शिक्षणाचा सर्व खर्च या व्यवसायातूनच करतात.
आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुढे आहेत. पण शिक्षण नसतानाही काही महिला कष्ट करून घर चालवतात. अशाच राहाता तालुक्यातील आशा शिवंदे या घर चालवण्यासाठी अनेक पिढ्यांपासून चालत आलेला व्यवसाय करून महिलांसाठी एक चांगलं उदाहरण आहेत.
advertisement
भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, पोंगे, वटाणे, सूर्यफूल बी विकून त्या पैसे कमावतात. गेल्या चार पिढ्यांपासून त्यांचा हा व्यवसाय चालू आहे. बाजारात विक्री करून त्या घर, मुलं यांचा सांभाळ करून हा व्यवसाय करतात. तसेच त्यांच्याकडे तयार केलेला फुटाणा हा भाजून त्याला मीठ लावलं जातं. त्याचप्रमाणे शेंगदाणे हे पाण्यात भिजत ठेवून नंतर ते मीठ लावून सुकवले जातात आणि मग रेतीत कडक होईपर्यंत भाजले जातात आणि त्यानंतर ते तयार होतात.
सर्वाधिक विक्री ही शेंगदाण्याची होती. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे तयार करण्यात येणारे पोंगे हे भाजलेले असतात, तेलात तळलेले नसतात. भाजलेले असल्यामुळे लहान मुलांना ते देऊ शकतो. त्याचा काही त्रास होत नाही. त्यात जास्त प्रमाणात नागलीच्या पोंग्यांची विक्री होते. हे सर्व काही फ्रेश तयार करून बाजारात त्याची विक्री करतात. या व्यवसायातून कमाई करून त्याचाच घर चालवण्यात हातभार लावत आहेत आणि त्यांनी महिलांना खचून न जाता कष्ट करा, लढा आणि सक्षम व्हा, असा संदेश दिला आहे.