तातसुकी यांनी त्यांच्या 'द फ्यूचर आय सॉ' (The Future I Saw) या 1999 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात या भविष्यवाण्या नमूद केल्या आहेत. या पुस्तकाची नवीन आवृत्ती 2021 मध्ये प्रकाशित झाली आहे.
युद्ध आणि आर्थिक संकट
'बाबा वेंगा' यांच्या अंदाजानुसार 2025 हे वर्ष केवळ युद्धाचेच नव्हे तर गंभीर आर्थिक संकटाचेही असेल. त्यांनी म्हटले होते की, जगात राजकीय अस्थिरता वाढेल. ही अस्थिरता अशा धोरणांमुळे आणि कृतींमुळे निर्माण होईल. ज्यामुळे जागतिक बाजारपेठा हादरून जातील. सध्या जगाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरत असल्याचे अनेकांना वाटत आहे.
advertisement
उलथापालथ कशी झाली?
सध्या मोठ्या देशांमधील तणाव वाढत आहे. ज्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे. उदाहरणार्थ- अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या काही वस्तूंवर 145% पर्यंत कर (टॅक्स) लावला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये एक प्रकारचे व्यापार युद्ध (ट्रेड वॉर) सुरू झाले आहे. वस्तूंच्या पुरवठ्यात अडचणी येत आहेत आणि त्यामुळे आर्थिक संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे. 'बाबा वेंगा' यांनी ज्या 'जागतिक पतना' (Global collapse) बद्दल सांगितले होते ते खरे ठरताना दिसत आहे. हे आर्थिक तणाव त्यांच्या या भविष्यवाणीला दुजोरा देतात की जगात अराजकता पसरू शकते.
संपूर्ण जगावर परिणाम
आजकाल जगाची अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडलेली आहे. जर एखाद्या मोठ्या देशाची अर्थव्यवस्था ढासळली तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो. जेव्हा बाजारपेठेत चढ-उतार होतात, महागाई वाढते आणि देश आपल्या बाजारपेठांचे रक्षण करण्यासाठी नवीन धोरणे आखतात, तेव्हा आर्थिक विनाशाचा धोका नेहमीच असतो.
कोण आहेत बाबा वेंगा?
रयो तातसुकी यांना अनेकदा 'बाबा वेंगा' यांच्याशी जोडले जाते. बल्गेरियाच्या बाबा वेंगा या जन्माने अंध होत्या आणि त्यांना गूढवादी मानले जात असे. आता त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये 9/11 चे हल्ले आणि राजकुमारी डायना यांच्या मृत्यू यांसारख्या घटनांचा उल्लेख आहे. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशेषतः इंस्टाग्राम आणि एक्स वर 'बाबा वेंगा' यांच्या भविष्यवाण्यांची खूप चर्चा आहे.