सध्या ही मर्यादा 1 लाख रुपये आहे, जी मे 2024 मध्येच 50 हजार रुपयांवरून वाढवण्यात आली होती. पण आता ती पाचपट वाढवून 5 लाख रुपये करण्याची तयारी सुरू आहे. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, ऑटो क्लेम सेटलमेंटची संख्या आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सुमारे 90 लाख होती. जी वाढून 2024-25 मध्ये 2 कोटींपर्यंत पोहोचली आहे. हे दर्शवते की ऑटो-सेटलमेंटची सुविधा सदस्यांसाठी खूपच फायदेशीर ठरली आहे.
advertisement
एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे काढण्याची सुविधा
CBT च्या पुढील बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जूनपासून EPFO दावे एटीएम आणि यूपीआयसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे देखील काढता येतील. यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने तांत्रिक रचना तयार केली आहे. जर हा निर्णय मंजूर झाला. तर पीएफमधून पैसे काढणे एटीएममधून पैसे काढण्याइतकेच सोपे होईल.
सोन्याबाबत आली मोठी अपडेट, Gold आता धातू नाही तर ...; कारण वाचून थक्क व्हाल
कार्यालयात न जाता मिळणार पैसे
EPFO च्या या निर्णयामुळे वैद्यकीय आणीबाणी, घराची दुरुस्ती किंवा उच्च शिक्षणासारख्या गरजांसाठी लोकांना त्वरित आणि सहजपणे पैसे मिळू शकतील. यापूर्वी 1 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी EPFO कार्यालयात जावे लागत होते आणि प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया लांब चालायची. पण आता ही अडचण दूर होणार आहे.
त्रास कमी होणार
ग्रांट थॉर्नटन इंडियाचे पार्टनर अखिल चंदना यांच्या मते, ASAC मर्यादा वाढवणे हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. यामुळे पीएफ खातेधारकांना आणीबाणीच्या स्थितीत लवकर निधी मिळेल आणि EPFO अधिकाऱ्यांवरील कामाचा ताणही कमी होईल.
काय आहे ऑटो क्लेम सेटलमेंट?
EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांच्या सोयीसाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची (Auto Claim Settlement) एक अशी व्यवस्था सुरू केली आहे. ज्यामुळे तुम्ही कोणत्याही कार्यालयात हेलपा न मारता काही विशिष्ट परिस्थितीत तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. ही एक डिजिटल प्रक्रिया आहे. ज्यामध्ये तुम्ही काही खास कारणांसाठी जसे की वैद्यकीय आणीबाणी, घराची दुरुस्ती, लग्न किंवा शिक्षणासाठी पैसे काढल्यास ते आपोआप सेटल होतात.
