Gold Price News: सोन्याबाबत आली मोठी अपडेट, Gold आता धातू नाही तर ...; कारण वाचून थक्क व्हाल
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold Price: सन 2025 मध्ये सोन्याने ऐतिहासिक झेप घेतली असून, त्याचे दर प्रति औंस 3500 च्या वर गेले आहेत. डॉलर आणि अमेरिकन ट्रेझरी रोख्यांवरील विश्वास ढासळत असताना, सोनं आता केवळ धातू न राहता ‘जागतिक चलन’ म्हणून पुढे येत आहे.
नवी दिल्ली: सन 2025 मध्ये सोन्याच्या किमतींनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मंगळवारी सोन्याचा भाव प्रति औंस 3,500 च्या पुढे गेला. अमेरिकेच्या ट्रेझरी बॉण्ड्स (सरकारी रोखे) आणि डॉलर यांसारख्या पारंपरिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मालमत्तांची विक्री होत असताना सोन्याची मागणी इतकी का वाढली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आता सोने केवळ एक धातू राहिलेले नाही. तर जगाच्या बदलत्या अर्थव्यवस्थेत ते विश्वासाचे चलन बनले आहे. जेव्हा अमेरिकेचे बॉण्ड किंवा डॉलरसारखे पारंपरिक पर्याय अस्थिर होतात. तेव्हा सोने खरे सुरक्षित म्हणून समोर येते, असे सीएनबीसी इंटरनॅशनलच्या एका विशेष अहवालात नमूद केले आहे. या अहवालात ट्रम्प आणि डॉलर यांच्या संदर्भात काही प्रमुख कारणे दिली आहेत:
advertisement
1. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे विश्वासाला हादरा: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क (टॅरिफ) धोरणांमुळे जागतिक बाजारांना मोठा धक्का बसला. अमेरिकेने अनेक देशांवर ‘परस्पर शुल्क’ लागू केले. ज्यामुळे डॉलर आणि ट्रेझरी रोख्यांवरील विश्वास कमी झाला.
2. डॉलर आणि ट्रेझरी आता सुरक्षित आश्रय नाहीत: सामान्यतः जेव्हा संकट येते, तेव्हा गुंतवणूकदार डॉलर आणि सरकारी रोखे (जसे की ट्रेझरी) खरेदी करतात. पण या वेळी या दोन्हीमध्ये विक्री दिसून आली. याचे कारण म्हणजे अमेरिकेची अंतर्गत धोरणे आणि फेडरल रिझर्व्ह बँकेवरील राजकीय दबाव.
advertisement
3. सोन्याला क्रेडिट रिस्क नाही: डॉलर किंवा ट्रेझरी रोख्यांचे मूल्य कोणत्याही सरकारची आर्थिक स्थिती यावर अवलंबून असते. पण सोने कोणत्याही एका देशाशी जोडलेले नसते. त्यामुळेच राजकीय किंवा आर्थिक अनिश्चिततेत ते सर्वात सुरक्षित मानले जाते.
4. महागाईपासून वाचवणारी मालमत्ता: शुल्क धोरणांमुळे अमेरिकेत महागाई वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सोने महागाईपासून संरक्षणाचे (inflation hedge) काम करते.
advertisement
5. डॉलर कमकुवत : डॉलरकमकुवत झाल्यामुळे सोने आणि इतर वस्तू, ज्यांची खरेदी डॉलरमध्ये होते. त्या इतर चलनांच्या गुंतवणूकदारांसाठी स्वस्त झाल्या. यामुळे सोन्याची मागणी आणखी वाढली.
6. मध्यवर्ती बँकांची खरेदी: उदयोन्मुख देशांच्या मध्यवर्ती बँका आता डॉलरऐवजी सोन्यामध्ये त्यांचे राखीव निधी (reserve) डाइवर्सिफाई करत आहेत. हे पाऊल भविष्यात डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे.
advertisement
7. गुंतवणूकदारांना भीती, अमेरिका 'सेफ हेवन'चा दर्जा गमावू शकते: बाजाराच्या मते ट्रम्प यांचे धोरण अमेरिकेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करू शकते. यामुळे ट्रेझरी रोखे आणि डॉलरच्या विश्वासार्हतेत घट झाली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 24, 2025 8:13 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Price News: सोन्याबाबत आली मोठी अपडेट, Gold आता धातू नाही तर ...; कारण वाचून थक्क व्हाल







