मुंबई: बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ने नुकतीच आपल्या प्रमुख निर्देशांकांची पुनर्रचना (Index Reconstitution) जाहीर केली आहे. ज्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठे बदल होणार आहेत. या बदलांनुसार देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या IndiGo ची मूळ कंपनी InterGlobe Aviation आता 22 डिसेंबर पासून BSE च्या 30 समभागांच्या प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) चा भाग बनेल.
advertisement
हा बदल निर्देशांकाच्या संरचनेला बाजाराच्या सध्याच्या परिस्थितीनुसार अधिक अद्ययावत करेल. या महत्त्वपूर्ण बदलामुळे Tata Motors Passenger Vehicles Ltd ला मात्र सेंसेक्समधून वगळण्यात येणार आहे. हे सर्व बदल 22 डिसेंबर सोमवार रोजी बाजार उघडल्यापासून लागू होतील.
सेन्सेक्सव्यतिरिक्त BSE 100 इंडेक्स मध्येही मोठा फेरबदल करण्यात आला आहे. बाजाराचे प्रतिनिधित्व आणि क्षेत्रांमधील संतुलन (Sectoral Balance) सुधारण्याच्या उद्देशाने, IDFC First Bank Ltd चा BSE १०० इंडेक्समध्ये समावेश केला जाईल, तर Adani Green Energy Ltd ला या यादीतून वगळण्यात येईल.
याव्यतिरिक्त BSE Sensex 50 मध्ये Max Healthcare Institute Ltd ला जोडले जाईल आणि त्याऐवजी IndusInd Bank Ltd ला वगळण्यात येईल. तसेच BSE Sensex Next 50 इंडेक्समध्ये IndusInd Bank आणि IDFC First Bank यांचा समावेश होईल. तर Max Healthcare Institute Ltd आणि Adani Green Energy यांना वगळले जाईल.
या संपूर्ण प्रक्रियेला BSE Re-shuffling (पुनर्रचना) असे म्हटले जाते. या पुनर्रचनेअंतर्गत एक्सचेंज वेळोवेळी आपल्या निर्देशांकात समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या यादीत सुधारणा करते. यामध्ये कंपन्यांची निवड त्यांच्या बाजार भांडवल (Market Cap), तरलता (Liquidity), ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि एकूण बाजारातील कामगिरीच्या आधारावर केली जाते. या बदलांमागील मुख्य उद्देश हा असतो की- सेन्सेक्स आणि इतर प्रमुख निर्देशांक देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि सध्याच्या बाजारपेठेतील गतिशीलतेचे अचूक प्रतिनिधित्व करत राहावेत.
