आयफोन नवीन सीरिज लाँच झाल्यावर आधीच्या सीरिजच्या मॉडेल्सच्या किमती कमी करते; पण या वेळी मात्र उलटंच घडलं आहे. अॅपलने नवीन आयफोन मॉडेल लाँच करण्याच्या काही महिन्यांपूर्वी विविध मॉडेल्सच्या किमती कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नवीन फोन सप्टेंबर 2024 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
Petrol vs Power Petrol: कोणतं पेट्रोल जास्त चांगलं जे देतं जास्त मायलेज?
advertisement
अॅपल आयफोन 15 प्रो हे मॉडेल 1,34,900 रुपये आणि आयफोन 15 प्रो मॅक्स हे मॉडेल 1,59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आलं होतं; पण डिस्काउंटनंतर आता आयफोन 15 प्रो 1,29,800 रुपयांना मिळत आहे आणि आयफोन 15 प्रो मॅक्स 1,54,000 रुपयांना खरेदी करता येत आहे. आयफोन 15 Pro ची किंमत 5,100 रुपयांनी, तर आयफोन 15 प्रो मॅक्सची किंमत 5,900 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
‘व्हॅनिला’ आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस या मॉडेल्सच्या किमतीती थोड्या कमी करण्यात आल्या आहेत. आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लसच्या किमती फक्त 300 रुपयांनी कमी झाल्या आहेत आणि आता हे फोन अनुक्रमे 79,600 आणि 89,600 रुपयांना मिळत आहेत.
अॅपल आयफोन 13 आणि अॅपल आयफोन 14 च्या किमतीत फक्त 300 रुपयांची किरकोळ कपात करण्यात आली आहे. परवडणाऱ्या आयफोन पैकी एक SE ची किंमत 2,300 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
याशिवाय आयफोन SE आता 47,600 रुपयांना घेता येऊ शकतो. पूर्वी त्याची किंमत 49,900 रुपये होती. अॅपल आयफोन 13 हा 59,600 रुपये आणि आयफोन 14 आता 69,600 रुपयांना विकला जात आहे.