या मार्केटमध्ये जीन्स, लायक्रा पँट्स, ट्रॅक पँट्स, कार्गो पँट्स, जॉगर पँट्स, तसेच कॉटन फॉर्मल पँट्स अशा विविध प्रकारच्या पँट्स आणि शर्ट्स देखील आहेत. पॅन्ट फक्त 200 ते 400 या दरामध्ये मिळतात. जीन्स फक्त 200 रुपयांपासून तर लायक्रा पँट्स फक्त 150 रुपयांपासून या ठिकाणी उपलब्ध आहेत. होलसेल दरात पँट्स खरेदी करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.
advertisement
नवउद्योजकांना मोठ्या प्रमाणावर नफा कमावण्यासाठी या ठिकाणची खरेदी फायद्याची ठरू शकते. इथं अगदी होलसेल दरात पँट्स मिळतात. परंतु, खरेदी करताना कमीत कमी 50 पीस खरेदी करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरुवातीस थोड्या प्रमाणात भांडवल गुंतवणाऱ्या व्यक्तींना चांगली कमाई करून देणारा ठरतो.
व्यवसाय सुरू करण्यासाठी
1) कमी किंमतीत दर्जेदार माल
2) ट्रेंडी आणि वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय
3) मुंबईतील सोयीस्कर लोकेशन
जर तुम्हाला कपड्यांचा व्यवसाय सुरु करायचा असेल, तर के. निप्रा गारमेंट्स हा तुमच्यासाठी एक परिपूर्ण पर्याय ठरू शकतो. योग्य मार्केटिंग आणि विक्री धोरण वापरून तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीतून चांगला व्यवसाय उभा करू शकता.