School Bags: मुलांसाठी स्कूल बॅग फक्त 200 रुपयांत, नाशिकमधील हे ठिकाण व्यावसायिकांसाठी बेस्ट खरेदी ऑप्शन!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
आता लवकरच शाळा-कॉलेज सुरू होणार आहेत. शाळेत जाण्यासाठी अनेक लहान मुले उत्सुक देखील आहेत. त्यामुळे शालेय वस्तू घेण्यासाठी देखील बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी ही बघायला मिळत आहे.
नाशिक: आता लवकरच शाळा-कॉलेज सुरू होणार आहेत. शाळेत जाण्यासाठी अनेक लहान मुले उत्सुक देखील आहेत. त्यामुळे शालेय वस्तू घेण्यासाठी देखील बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी ही बघायला मिळत आहे. तुम्हालाही मुलांसाठी स्वस्तात स्कूल बॅग, तसेच कॉलेज बॅग घ्यायची असेल तर नाशिकमधील महावीर बॅगमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 200 रुपयांपासून चांगल्या अशा बॅग मिळणार आहेत. तसेच यांच्याकडून होलसेल दरात बॅग घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील करू शकणार आहात.
महावीर बॅग ही गेल्या 76 वर्षांपासून नाशिककरांना होलसेल दरात बॅग तसेच कॉलेज बॅग, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज पर्स यासारख्या वस्तू पुरवत असते. तसेच यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग असल्याने ते हा माल संपूर्ण महाराष्ट्रात होलसेल दरात देखील पोहोचवत असतात. यांच्याकडे तुम्हाला व्हीआयपी, स्काय बॅग, अमेरिकन टुरिस्ट यासारख्या नामांकित कंपनीच्या बॅग देखील होलसेल भावात मिळत असतात.
advertisement
यांचे वैशिष्ट्य असे आहे, यांच्याकडून घेतलेल्या बॅगची शिलाई कधी निघाली तर ते फ्रीमध्ये ती करून देत असतात. तसेच कुणाला बॅग व्यवसाय करायचा असल्यास हे त्यांना योग्य आणि होलसेल दरात आपला माल हा पुरवत असतात. फक्त 30 रुपयांपासून त्यांच्याकडे अनेक प्रकारचे बॅग, हॅन्ड पाऊच सारख्या गोष्टी या उपलब्ध आहेत.
advertisement
एक वेळेस भेट देऊन माल घेऊन गेलात तर तुम्हाला हे पुढे देखील तुमच्या शहरात त्यांच्या मालाची डिलिव्हरी ते देत असतात. तुम्हाला देखील नवीन व्यवसाय करायची इच्छा असल्यास तुम्ही देखील यांच्याशी संपर्क साधू शकणार आहात. यांचे महावीर बॅग हे दुकान नाशिक रोडवरील डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याजवळ उपलब्ध आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
June 10, 2025 12:43 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
School Bags: मुलांसाठी स्कूल बॅग फक्त 200 रुपयांत, नाशिकमधील हे ठिकाण व्यावसायिकांसाठी बेस्ट खरेदी ऑप्शन!

