वाघाचा दरारा कायम! निकालाआधीच डोंबिवलीत म्हात्रे नवरा-बायकोचे बॅनर, दोघांना शुभेच्छा

Last Updated:

Kalyan Dombivili Mahanagar Palika Election: गुरुवारी १५ जानेवारी रोजी राज्यातील २९ महानगर पालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आज या सर्वच ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

News18
News18
प्रदीप भनगे, प्रतिनिधी कल्याण डोंबिवली: गुरुवारी १५ जानेवारी रोजी राज्यातील २९ महानगर पालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आज या सर्वच ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पुढच्या एक-दोन तासांच सुरुवातीचा कल हाती लागताच राज्यातील चित्र स्पष्ट होणार आहे. पण निकालाला काही तास बाकी असतानाच डोंबिवलीतून मोठी अपडेट समोर आली आहे.
इथं शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचे बॅनर लागले आहेत. संबंधित बॅनरवर निकालाआधीच शिंदे गटाचे उमेदवार विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल दोघांचं अभिनंदन केलं आहे. स्थानिक कार्यकर्त्यांकडून अशाप्रकारे बॅनर लावून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
'वाघाचा दरारा कायम' असा मजकूर देखील या बॅनरवर लिहिला आहे. निकालाआधीच डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचे विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांच्या विजयाचे बॅनर झळकल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. यंदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी म्हात्रे दाम्पत्यावर मोठा विश्वास दाखवला होता. प्रभाग क्रमांक २२ ड मधून शिंदेंनी विकास म्हात्रेंना उमेदवारी दिली होती. तर २२ क मधून कवित्रा म्हात्रेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. आता दोघांच्या विजयाचे बॅनर लागले असून प्रत्यक्ष निकालात काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
122 नगरसेवक असणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत सुरुवातीपासून महायुतीत रस्सीखेच बघायला मिळत होती. इथं जागावाटपावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात खटके उडाले होते. पण अखेर वरिष्ठांच्या आदेशानुसार, दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाघाचा दरारा कायम! निकालाआधीच डोंबिवलीत म्हात्रे नवरा-बायकोचे बॅनर, दोघांना शुभेच्छा
Next Article
advertisement
BMC Election: ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दावा
ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दाव
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे.

  • ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये पडद्याआड हातमिळवणीबाबत घडामोडी सुरू असल्याचा दावा

  • भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप...

View All
advertisement