Pandharpur: चंद्रभागेच्या वाळवंटातील देवदूत, होडी चालकाने आत्तापर्यंत वाचवले तब्बल 500 भाविकांचे प्राण!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
बुडू लागलेल्या भाविकांना जीवनदान देण्याचे काम येथील होडी चालक अप्पा करकंबकर करत आहेत. आजपर्यंत त्यांनी 500 भाविकांना जीवनदान देण्याचे काम केले आहे.
सोलापूर: पंढरपूरमध्ये सातत्याने भाविक भक्तांची वर्दळ असून, हे भाविक भक्त स्नान करण्यासाठी चंद्रभागा नदीत जात असतात. परंतु, त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही. अशा बुडू लागलेल्या भाविकांना जीवनदान देण्याचे काम येथील होडी चालक अप्पा करकंबकर करत आहेत. आजपर्यंत त्यांनी 500 भाविकांना जीवनदान देण्याचे काम केले आहे.
अप्पा करकंबकर पंढरपूर भीमा नदीच्या पात्रात होडी चालवतात. चार ते पाच वर्षांपासून भीमा नदीच्या पात्रात ते होडी चालवत आहेत. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन भाविक चंद्रभागेच्या नदीपात्रात स्नान करण्यासाठी येतात. भाविकांना नदीमधील पाण्याचा अंदाज न आल्याने पात्रात भाविक बुडत असतात. अशा भाविकांचा जीव अप्पा करकंबकर हे जणू देवमाणसासारखे येऊन त्यांचा जीव वाचवत आहेत.
advertisement
आतापर्यंत होडी चालक अप्पा यांनी जवळपास 500 हून अधिक भाविकांचा जीव वाचवला आहे. तर काही जण या ठिकाणी घरगुती कारण, आर्थिक संकट किंवा नैराश्यातून आत्महत्या करण्यासाठीही लोक येतात. अशांचा देखील जीव अप्पा यांनी वाचवला आहे.
advertisement
आषाढी वारीत भाविकांची मोठी गर्दी असते. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. काही भाविकांना स्नान करत असताना पाण्याची पातळी कळत नसते. त्यामुळे, ते पाण्यात बुडत असतात. पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या सूचनेचे पालन करावे. जास्त खोल पाण्यात जाऊन स्नान करू नये, असे आवाहन होडी चालक अप्पा करकंबकर यांनी केले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
June 10, 2025 12:00 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
Pandharpur: चंद्रभागेच्या वाळवंटातील देवदूत, होडी चालकाने आत्तापर्यंत वाचवले तब्बल 500 भाविकांचे प्राण!