Jalna News: रस्ता ना वीज, प्रसूतीसाठी 2 किमीची पायपीट, जालन्यातील या गावात मुलभूत सुविधांचा आजही अभाव

Last Updated:

मागील दोन महिन्यांपासून या गावातून वीज गायब आहे. गावातील लोकांना महिलांच्या प्रसूतीसाठी दोन किमी अंतरापर्यंत गाडी बैलात प्रवास करावा लागतो.

+
News18

News18

जालना: आपला भारत देश यशाची नवनवी शिखरे गाठत आहे. नुकताच भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. देशाची वाटचाल एकीकडे महासत्ता होण्याकडे सुरू असताना आजही काही गावांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये, मूलभूत सुविधांचा अभाव आहे. जालना जिल्ह्यातील मांडवा गावातील गायरान वस्ती ही 400 ते 500 लोकांची वस्ती देखील त्यापैकीच एक. मागील दोन महिन्यांपासून या गावातून वीज गायब आहे. गावातील लोकांना महिलांच्या प्रसूतीसाठी दोन किमी अंतरापर्यंत गाडी बैलात प्रवास करावा लागतो. लोकल 18 च्या प्रतिनिधीने मांडवा येथील ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहुयात.
मांडवा हे जालना शहरापासून 18 ते 20 किमी अंतरावर बदनापूर तालुक्यातील गाव आहे. मुख्य गावापासून दोन ते तीन किमी अंतरावर 400 ते 500 लोकसंख्या असलेली गायरानवाडी नावाची वस्ती आहे. या गावात आजही सिंगल फेज 24 तास असणारी वीज पोहोचलेली नाही. विद्युत पंपांसाठी दिली जाणारी केवळ 8 तासांची वीज या गावात याआधी उपलब्ध होती.
advertisement
परंतु मे महिन्यात आलेल्या चक्रीवादळाने गावातील एक खांब कोसळला. दोन महिने उलटले तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जाग आली नाही. त्यामुळे मे महिन्यापासून या गावातील नागरिक अंधारात जीवन व्यतीत करण्यास मजबूर आहेत. या गावात फक्त विजेचाच प्रश्न नाही. गावापासून दोन किमी अंतरावर मुख्य रस्ता आहे. या रस्त्यापर्यंत जाण्याला पक्का म्हणावा असा रस्ता नाही. त्यामुळे प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या लेकीबाळींना रुग्णालयात नेण्यासाठी दीड ते दोन किमी बैलगाडीत टाकून न्यावे लागते.
advertisement
देश एकीकडे आर्थिक प्रगती करत असताना या गावांमध्ये मात्र रस्तावीज यासारख्या मूलभूत सुविधा देखील नाहीतपावसाळा सुरू झाल्याने डेंगूमलेरिया सारखे आजार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. गावात डासांचे प्रमाण प्रचंड आहेगावातील सर्व नागरिक घराच्या बाहेर असलेल्या अंगणात झोपतात. पंख्यासारखी इलेक्ट्रिक उपकरणे वीजच नसल्याने निरुपयोगी झाली आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने आम्हाला वीज आणि रस्ता या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
view comments
मराठी बातम्या/जालना/
Jalna News: रस्ता ना वीज, प्रसूतीसाठी 2 किमीची पायपीट, जालन्यातील या गावात मुलभूत सुविधांचा आजही अभाव
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement