Scam Alert : ही धोक्याची घंटा, नवीन Scam बाजारात, आता कोणत्याही लिंकवर क्लिक न करता ही हॅक होऊ शकतो तुमचा फोन
- Published by:Devika Shinde
Last Updated:
भारत सरकारची सायबर सुरक्षा एजन्सी CERT-In ने आता अँड्रॉइड (Android) युजर्ससाठी एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे.
मुंबई : तुमच्या हातात असलेला स्मार्टफोन आता केवळ संवादाचे साधन राहिलेले नाही, तर ते तुमच्या बँक खात्यापासून ते खासगी फोटोंपर्यंत सर्वच महत्त्वाच्या गोष्टींचे 'लॉकर' बनले आहे. आपण सहसा स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी एकच खबरदारी घेतो. ती म्हणजे अनोळखी लिंकवर क्लिक न करणे किंवा कोणाला ओटीपी (OTP) न सांगणे. पण विचार करा, तुम्ही कोणतीही चूक केली नाही, कोणत्याही लिंकला स्पर्शही केला नाही, तरीही तुमचा फोन हॅक झाला तर? ऐकायला थोडं धक्कादायक वाटेल, पण हे आता प्रत्यक्षात घडत आहे.
भारत सरकारची सायबर सुरक्षा एजन्सी CERT-In ने आता अँड्रॉइड (Android) युजर्ससाठी एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे.
काय आहे हा 'झिरो-क्लिक' (Zero-click) धोका?
सर्वसाधारणपणे सायबर हल्ल्यात हॅकर्स आपल्याला जाळ्यात ओढण्यासाठी एखादी लिंक पाठवतात. मात्र, सध्या चर्चेत असलेला हा धोका 'झिरो-क्लिक' प्रकारातील आहे. याचा अर्थ असा की, युजरने कोणतीही फाईल डाऊनलोड न करता किंवा लिंकवर क्लिक न करताही हॅकर्स दूर बसून तुमच्या फोनचा ताबा मिळवू शकतात.
advertisement
या धोक्याचे मूळ गुगलच्या अँड्रॉइड सिस्टिममधील 'Dolby Digital Plus (DD+)' युनिफाईड डिकोडरमध्ये असलेल्या एका तांत्रिक त्रुटीमध्ये आहे. या बगमुळे तुमच्या फोनची मेमरी करप्ट केली जाऊ शकते, ज्यामुळे तुमची खासगी माहिती, पासवर्ड आणि बँकिंग तपशील हॅकर्सच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
गुगल आणि डॉल्बीचे काय म्हणणे आहे?
गुगलने आपल्या अधिकृत सिक्युरिटी बुलेटिनमध्ये या त्रुटीची दखल घेतली असून याला 'क्रिटिकल' श्रेणीत ठेवले आहे. डॉल्बीच्या मते, त्यांच्या डिकोडरच्या जुन्या व्हर्जनमध्ये (4.5 आणि 4.13) ही त्रुटी होती. सुदैवाने, यावर उपाय शोधण्यात आला असून जानेवारी 2026 चा लेटेस्ट सिक्युरिटी पॅच या धोक्याला रोखण्यासाठी सक्षम आहे.
advertisement
स्वतःचा बचाव कसा करायचा? (महत्त्वाच्या टिप्स)
CERT-In आणि टेक तज्ज्ञांनी युजर्सना तातडीने काही पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे:
सॉफ्टवेअर अपडेट करा तुमच्या फोनमध्ये जानेवारी 2026 चा सिक्युरिटी अपडेट आला आहे का ते तपासा.
फोनच्या Settings मध्ये जा > System Update किंवा Software Update वर क्लिक करा > अपडेट उपलब्ध असल्यास ते लगेच डाऊनलोड आणि इंस्टॉल करा.
advertisement
जुन्या अँड्रॉइड व्हर्जनवर चालणाऱ्या फोनला हा धोका जास्त असू शकतो, त्यामुळे फोन नेहमी लेटेस्ट ओएस (OS) वर ठेवा.
तंत्रज्ञान जितके प्रगत होत आहे, तितकेच हॅकर्सचे मार्गही क्लिष्ट होत आहेत. "मी काहीच केलं नाही तर माझं काय होणार?" हा विचार आता जुना झाला आहे. त्यामुळे डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी केवळ सावधगिरी पुरेशी नाही, तर आपले डिव्हाइस अपडेट ठेवणे ही काळाची गरज बनली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 9:31 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Scam Alert : ही धोक्याची घंटा, नवीन Scam बाजारात, आता कोणत्याही लिंकवर क्लिक न करता ही हॅक होऊ शकतो तुमचा फोन









