खरं तर, आपण गवती चहा अर्थात लेमन ग्रास लागवडीबद्दल बोलत आहोत. हा व्यवसाय 20 हजार रुपयांपेक्षा कमी खर्चात सुरू करता येतो आणि योग्य पद्धतीने याची शेती करून लाखो रुपये कमवू शकतो.
एक हेक्टर जमिनीवर गवती चहाची लागवड करून चार लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवता येते. एकेकाळी गवती चहाच्या लागवडीबाबत भारत खूप मागे होता. पण आता भारताने यात बरीच प्रगती केली आहे. भारत आता गवती चहा निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.
advertisement
पुण्याच्या 10वी पास शेतकऱ्याने भंगारातून बनवली विंटेज इलेक्ट्रिक कार, 'एलन मस्क'लाही सुचलं नसेल!
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की गवती चहापासून बनवलेल्या तेलाला खूप मागणी आहे. या शिवाय अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधनं, साबण आणि औषधं तयार करण्यासाठीदेखील गवती चहाचा वापर केला जातो. कोरडवाहू क्षेत्रातसुद्धा गवती चहाची लागवड करता येते.
एक हेक्टर क्षेत्राबाबत बोलायचं झालं तर यातून 12 ते 13 टन गवती चहाचं उत्पादन मिळतं. पहिली कापणी सोडून दुसऱ्या कापणीचा विचार केला तर सुमारे पाच पट पीक काढता येतं. याचाच अर्थ वर्षभरात सुमारे 60 ते 65 टन गवती चहाचं उत्पादन हाती येतं. त्याचवेळी एक टन गवती चहापासून सुमारे पाच लिटर तेल निघतं. अशाप्रकारे एका वर्षात सुमारे 300 ते 325 लिटर तेल मिळतं. बाजारात प्रतिलिटर तेलाचा दर 1200 ते 1500 रुपये आहे. या स्थितीत चार ते पाच लाख रुपयांची कमाई करणं सोपं आहे.
एकदा लागवड केली की 25 वर्ष नो टेन्शन, दरवर्षी कमाईच कमाई!
गवती चहा पिकाला किंवा त्याच्या लागवडीकरिता जास्त पाणी लागत नाही. याला किड लागत नाही तसेच भटकी जनावरे देखील या पिकाचे नुकसान करत नाही. त्यामुळे ही महत्त्वाची जोखीम आपोआप दूर राहते.
