एकदा लागवड केली की 25 वर्ष नो टेन्शन, दरवर्षी कमाईच कमाई!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
शेतीतून आपण लाखोंचा नफा मिळवू शकता. परंतु त्यासाठी अभ्यासपूर्ण शेती करणं आवश्यक आहे. सध्या फळझाडं, फूलझाडं आणि भाजीपाल्याच्या लागवडीतून शेतकरी चांगलं उत्पन्न मिळवतात.
काळानुसार बदल हा अत्यंत आवश्यक असतो. हेच सूत्र पाळून शेतकरी बांधव शेतीत विविध प्रयोग करतात. त्यातले काही फसतात, तर काही लाखोंचा नफा देतात. बिहारचे एक शेतकरी तर आता एका हंगामात लाखोंची कमाई करतात. ही कमाई होते संत्र्यांच्या लागवडीतून.

advertisement
विनोद कुमार मंडल असं या शेतकऱ्याचं नाव. ते संत्र्यांचं उत्तम उत्पादन घेतात आणि त्यांना बाजारपेठेत मागणीही चांगली मिळते.

साडेचार कट्ठा शेतात त्यांनी संत्र्यांची 100 झाडं लावली आहेत. या झाडांसाठी ते केवळ जैविक खतांचा वापर करतात.
advertisement

विनोद कुमार सांगतात की, कमी खर्चात करता येणाऱ्या या शेतीतून 25 वर्ष उत्पादन मिळतं. एका हंगामात एका झाडाला कमीत कमी 30 किलो फळं येतात.
advertisement

बाजारात संत्र्यांचा भाव सध्या 100 रुपये प्रति किलो इतका आहे. शिवाय विनोद कुमार यांच्या झाडांच्या संत्र्यांची चव अतिशय उत्कृष्ट असल्यामुळे त्यांना बाजारात चांगली मागणी मिळते.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
view commentsLocation :
Bihar
First Published :
Oct 26, 2023 9:43 PM IST








