पुण्याच्या 10वी पास शेतकऱ्याने भंगारातून बनवली विंटेज इलेक्ट्रिक कार, 'एलन मस्क'लाही सुचलं नसेल!
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
आपली स्वतःची गाडी असावी, आपणही हक्काच्या चारचाकीतून फिरावं असं जवळपास प्रत्येक सर्वसामान्याचं स्वप्न असतं. अनेकांसाठी हे स्वप्न स्वप्नच राहतं, तर काहीजण मात्र मोठ्या जिद्दीने ते पूर्ण करतात. अशीच एक यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
advertisement
एकदा दिल्लीत त्यांनी ई-रिक्षा पाहिल्या. आता त्यांना काही राहवेना. घरी आल्यावर त्यांनी आपल्या स्वप्नातली विंटेज कार बनवायचीच असं ठरवलं. त्यासाठी महागडे पार्ट्स नाही तर गावातल्या भंगाराच्या दुकानातून गाडीचे साहित्य जमवले आणि कागदावर अगदी हवी तशी विंटेज कार रेखाटली. इथूनच सुरू झाला त्यांच्या गाडीचा 'विंटेज' प्रवास...
advertisement
रोहिदास यांनी अवघ्या अडीच महिन्यांत कार बनवून तयार केली. यात त्यांना त्यांच्या भावाने, मुलांनी आणि मित्राने साथ दिली. अगदी जुगाड करून बनवलेली ही लाल रंगाची कार आज रस्त्यावर लोक थांबून थांबून पाहतात. दसऱ्याच्या मुहूर्तावर काम पूर्ण करून, विधिवत पूजा करून रोहिदास नवघणे यांनी ही कार रस्त्यावर उतरवली आणि सर्वात आधी संत तुकोबांचं दर्शन घेतलं.
advertisement
ही विंटेज कार बनवण्यासाठी काहीच पैसे लागले नाहीत असं नाही, तर तब्बल अडीच लाखांचा खर्च आला. मात्र तो नव्याकोऱ्या विंटेज कारपेक्षा फार कमी आहे. शिवाय ही कार बॅटरीवर चालणारी असून त्यात पाच बॅटऱ्या लावल्या आहेत. 5 ते 6 तास चार्ज केल्यानंतर ती 100 किलोमीटरपर्यंत आरामात चालू शकते. सध्या रस्त्यावर ही कार पाहून भलेभले विचारात पडतात.








