TRENDING:

इतकी पगारवाढ? विश्वास बसणार नाही! कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 18,000 वरून थेट 51,480 + पेन्शन

Last Updated:

Salary Hike: काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ८व्या वेतन आयोगाला मंजुली दिली होती. या आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 186 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

advertisement
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 8व्या केंद्रीय वेतन आयोगाला मंजुरी दिली असून यामुळे सरकारी कर्मचारी आनंदात आहेत. नव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन किती वाढणार याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. काही अहवालांनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 108% ते 186% पर्यंत वाढ होऊ शकते.
News18
News18
advertisement

हा फॅक्टर ठरवणार वेतन वाढीचे प्रमाण

8व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत फिटमेंट फॅक्टरच्या आधारे वेतन वाढ ठरवली जाणार आहे. नेशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशीनरी (NC-JCM) आणि कर्मचारी संघटनांनी किमान 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरची शिफारस केली आहे. मात्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सरकार 1.92 ते 2.08 दरम्यान फिटमेंट फॅक्टर लागू करू शकते.

advertisement

शेअर बाजाराचे काही खरे नाही, छोट्या गुंतवणूकदारांना पैसे वाचवायचे असतील तर...

किती वाढू शकते वेतन?

फिटमेंट फॅक्टर 2.08 ठरल्यास

किमान बेसिक वेतन: ₹18,000 वरून ₹37,440 होऊ शकते.

पेन्शन: ₹9,000 वरून ₹18,720 पर्यंत वाढू शकते.

RBIने 30,73,41,03,00,000 खर्च केले, पण कशासाठी? पत्रक काढून स्वत: दिली माहिती

फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत गेल्यास

advertisement

किमान बेसिक वेतन: ₹51,480 होऊ शकते.

पेन्शन: ₹25,740 पर्यंत वाढू शकते.

8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी कधी लागू होणार?

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 16 जानेवारी 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाच्या मंजुरीची घोषणा केली. 2026 मध्ये 7व्या वेतन आयोगाचा कालावधी संपणार असल्याने 2025 मध्ये नवीन शिफारशी तयार करण्यात येणार आहेत.

आणखी काही दिवस, शेअर बाजारात येणार पैशाचा महापूर; गुंतवणूकदारांनी चूक करू नये

advertisement

वेतन आयोग म्हणजे काय?

भारत सरकार सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेसाठी वेळोवेळी वेतन आयोग स्थापन करते. पहिला वेतन आयोग 1947 मध्ये स्थापन झाला होता. आतापर्यंत सात वेतन आयोग लागू झाले असून आता 8वा वेतन आयोग नव्या शिफारशींसह लवकरच येणार आहे.

मराठी बातम्या/मनी/
इतकी पगारवाढ? विश्वास बसणार नाही! कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 18,000 वरून थेट 51,480 + पेन्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल