नेमकं काय घडलं?
अमेरिकेतील सिटी बँकेच्या एका मोठ्या चुकीमुळे एका ग्राहकाच्या खात्यात तब्बल 81 ट्रिलियन डॉलर (सुमारे 70 लाख कोटी रुपये) जमा झाले. सिटी बँकेला एका ग्राहकाच्या खात्यात 280 डॉलर (सुमारे 24,500 रुपये) जमा करायचे होते. मात्र चुकून 81 ट्रिलियन डॉलर ट्रान्सफर करण्यात आले. फाइनेंशियल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही चूक झाल्यानंतर म्हणजे पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर फक्त 90 मिनिटांत बँकेच्या ती लक्षात आली आणि तातडीने त्यावर कारवाई झाली. या 90 मिनिटात ज्या खातेदाराच्या खात्यात ती रक्कम गेली होती त्याने देखील ती काढण्याचा प्रयत्न केला नाही.
advertisement
बाजारातील महाभयंकर 'मॅडनेस'ने लावला १८ लाख कोटींचा चुना; डोळ्यांसमोर उडाला पैसा!
सिटीग्रुपच्या प्रवक्त्याने FT ला सांगितले की, इतकी मोठी रक्कम प्रत्यक्षात हस्तांतरित होणे अशक्य होते. बँकेच्या अंतर्गत नियंत्रण व्यवस्थेने ही चूक त्वरित ओळखली आणि ती दुरुस्त करण्यात आली. यामुळे बँकेला किंवा ग्राहकाला कोणताही आर्थिक तोटा झाला नाही.
मोठ्या चुका
सिटी बँकेने अशी मोठी चूक प्रथमच केलेली नाही. FT च्या अहवालानुसार, गेल्या वर्षी 1 अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक रकमेचे 10 'नियर मिस' प्रकार घडले. मात्र 2022 मध्ये अशा 13 चुका झाल्या होत्या. 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रकमेच्या चुका अमेरिकन बँकिंग विश्वात अत्यंत दुर्मिळ मानल्या जातात.
शेअर बाजारात Black Friday, या एका गोष्टीने गुंतवणूकदारांचा केला घात
सावध रहा!
जरी बँकेच्या चुकीने तुमच्या खात्यात मोठी रक्कम आली, तर ती वापरण्याची चूक करू नका. बँका ही रक्कम परत घेऊ शकतात आणि त्याचा गैरवापर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.