शेअर बाजारातील महाभयंकर 'मॅडनेस'ने लावला १८ लाख कोटींचा चुना; डोळ्यांसमोर उडाला गुंतवणुकदारांचा पैसा!

Last Updated:

Share Market Crash: स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे बाजार भांडवलात १८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भू-राजकीय तणाव आणि उच्च स्टॉक मूल्यांकनामुळे घसरण वाढली. ही घसरण अनपेक्षित नव्हती, त्यामुळे गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

News18
News18
मुंबई: भारतीय शेअर बाजारातील घसरणीचा फटका सर्व कंपन्यांना बसत आहे. मात्र घसरणीत सर्वात जास्त फटका बसला आहे तो मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना होय.गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 18 लाख कोटी रुपये गमावले गेले आहेत. या कोसळण्यामागे जागतीक बाजारपेठेतील तणाव आणि शेअर्सचे अधिक मूल्यांकन (Overvaluation) हे मुख्य कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये सलग घसरण
28 फेब्रुवारी रोजी निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांकांमध्ये 3% पर्यंत घसरण झाली.
निफ्टी स्मॉलकॅप 100: उच्चांकाच्या तुलनेत 25% घसरला, ज्यामुळे 5.25 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
निफ्टी मिडकॅप 100: उच्चांकाच्या तुलनेत 21% घसरला, ज्यामुळे 13.35 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
advertisement
30 वर्षांत निफ्टीची सर्वात मोठी घसरण
शेअर बाजारातील ही घसरण फक्त मिडकॅप आणि स्मॉलकॅपपर्यंत मर्यादित राहिली नाही. तर निफ्टी 50 निर्देशांकालाही मोठा फटका बसला आहे. सप्टेंबर 2023 पासून सुरू झालेल्या घसरणीत निफ्टी 50 मध्ये 14% घट झाली आहे. जी गेल्या 30 वर्षांतील सर्वात मोठी आणि लांब घसरण आहे. यामुळे 31.94 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 28 फेब्रुवारी रोजी निफ्टी 50 मध्ये 1.19% ची घसरण झाली, जी सलग सातव्या दिवशी नोंदवली गेली.
advertisement
भोपळा फुटणार?
ICICI प्रूडेंशियलचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) एस. नरेन यांनी गुंतवणूकदारांना मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या अधिक मूल्यांकनाबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. SEBIच्या अध्यक्ष माधबी बुच यांनीही एक वर्षापूर्वी म्युच्युअल फंड कंपन्यांना बबल बद्दल सावध राहण्याची सूचना दिली होती. प्रसिद्ध गुंतवणूकदार प्रशांत जैन आणि कोटक इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीजचे संजीव प्रसाद यांनी आधीच या घसरणीबाबत चिंता व्यक्त केली होती.
advertisement
भविष्यातील ट्रेंड, गुंतवणूकदारांनी काय करावे?
समीर अरोरा (Helios Capital) यांच्या मते, तेजीच्या काळात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स दरवर्षी 6-8% जास्त परतावा देतात, पण बाजार कोसळल्यावर घसरणही अधिक तीव्र असते. निफ्टी आणि निफ्टी 500 निर्देशांकांनी गेल्या 7 वर्षांत सरासरी 13-16% परतावा दिला आहे, त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाईगडबड करू नये.
शेअर बाजारात Black Friday, या एका गोष्टीने गुंतवणूकदारांचा केला घात
स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सच्या घसरणीमुळे बाजारात भीतीचे वातावरण आहे. तज्ज्ञांचा सल्ला आहे की, गुंतवणूकदारांनी अधिक मूल्यांकन झालेले शेअर्स टाळावेत आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करावे.
मराठी बातम्या/मनी/
शेअर बाजारातील महाभयंकर 'मॅडनेस'ने लावला १८ लाख कोटींचा चुना; डोळ्यांसमोर उडाला गुंतवणुकदारांचा पैसा!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement