India Q3 GDP Data FY25: शेअर बाजाराने लुटले, पण अर्थव्यवस्थेने तारले; तिसऱ्या तिमाहीत GDP मोठी वाढ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
India GDP: शेअर बाजारातील घसरणीमुळे संपूर्ण देशात काळजीचे चित्र असताना अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत एक मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. तिसऱ्या तिमाहीत देशाचा GDP 6.2 टक्क्यांनी वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
मुंबई: भारताच्या आर्थिक विकासात मोठी सुधारणा झाली असून Q3 म्हणजेच आर्थिक वर्षाती तिसऱ्या तिमाहीमध्ये (ऑक्टोबर-डिसेंबर 2024) GDP 6.2 टक्क्यांनी वाढला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) शुक्रवारी जारी केलेल्या अहवालानुसार, ही वाढ मागील तिमाहीत नोंदवलेल्या 5.4% वाढीच्या तुलनेत चांगली असल्याचे दिसते. संपूर्ण आर्थिक वर्ष 2024-25 (FY25) मध्ये GDP वाढीचा दर 6.5% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, जो मागील अंदाजित 6.4% पेक्षा अधिक आहे.
तिसऱ्या तिमाहीत GDP ची स्थिती
- Q3 (ऑक्टोबर-डिसेंबर 2024) मध्ये GDP 47.17 लाख कोटी वर पोहोचला, जो मागील वर्षी याच कालावधीत 44.44 लाख कोटी होता.
- नाममूल्य (Nominal) GDP जो महागाई गृहित धरून मोजला जातो तो 9.9% ने वाढला आहे.
- GVA (Gross Value Added) देखील 6.2% वाढला, जो आर्थिक पुरवठ्याच्या वाढीचे प्रतिबिंब दर्शवतो.
advertisement
महत्त्वाच्या सुधारणा
- मागील तिमाहीत (Q2 FY25) जीडीपी वाढ 5.4% वरून सुधारून 5.6% करण्यात आली आहे.
- तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, Q3 मध्ये GDP 6.3% पर्यंत पोहोचेल असा अंदाज होता, पण हा आकडा 6.2% वर थांबला.
- सरकारच्या वाढत्या खर्चामुळे ही सुधारणा झाल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
advertisement
क्षेत्रनिहाय GDP वाढ
1. कृषी क्षेत्र – मोठी झेप- कृषी क्षेत्रात 5.6% वाढ, जी मागील वर्षी याच कालावधीत फक्त 1.5% होती.
2. उत्पादन क्षेत्र – मंदीचे संकेत- उत्पादन (Manufacturing) क्षेत्राची वाढ 3.5% इतकी राहिली, जी मागील वर्षी 14% होती.
advertisement
3. व्यापार आणि सेवा क्षेत्र – काहीशी घसरण - व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, संप्रेषण आणि प्रसारण क्षेत्रातील वाढ 6.7% वर राहिली, जी मागील वर्षी 8% होती.
4. गुंतवणुकीत वाढ – सकारात्मक संकेत- Gross Fixed Capital Formation (GFCF), जो देशातील गुंतवणुकीचा महत्त्वाचा संकेत आहे, 5.7% वाढला असून 15.05 लाख कोटींवर पोहोचला.
5. खाजगी उपभोग खर्च – वाढ, पण सरकारी खर्चात घसरण- Private Final Consumption Expenditure (PFCE) म्हणजेच खासगी खर्च 6.9% वाढून 28.10 लाख कोटी झाला. मात्र, Government Final Consumption Expenditure (GFCE) म्हणजेच सरकारी खर्च 8.3% घटून 3.73 लाख कोटी वर आला आहे.
advertisement
GDP सुधारले तरी आव्हाने कायम!
मागील तिमाहीत GDP वाढ 5.4% पर्यंत घसरली होती, त्यामुळे ही सुधारणा महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील मंदी आर्थिक स्थिरतेसाठी आव्हान निर्माण करू शकते. सरकारच्या खर्चात घट झाल्याने सरकारी धोरणांवर परिणाम होऊ शकतो.
FY25 मध्ये GDP 6.5% पर्यंत जाण्याचा अंदाज
NSO च्या अहवालानुसार, FY25 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 6.5% राहण्याचा अंदाज आहे, जो जागतिक बाजारपेठेत सकारात्मक संदेश देईल. आगामी तिमाहीत सरकारच्या धोरणांवर आणि जागतिक परिस्थितीवर अवलंबून भारताचा आर्थिक प्रवास ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 28, 2025 5:58 PM IST
मराठी बातम्या/मनी/
India Q3 GDP Data FY25: शेअर बाजाराने लुटले, पण अर्थव्यवस्थेने तारले; तिसऱ्या तिमाहीत GDP मोठी वाढ