TRENDING:

महाराष्ट्रातल्या छोट्या कंपनीचा मोठा पराक्रम, मार्केटमध्ये धूम; 1 लाखाचे झाले 25 लाख, दररोज ‘अपर सर्किट’ लागतोय

Last Updated:

Multibagger Share: तांब्याच्या किंमतींनी कमोडिटी मार्केटमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘मार्डिया सॅमयॉन्ग कॅपिलरी ट्यूब्स’ या कंपनीच्या शेअरने वर्षभरात तब्बल 2400% परतावा देत गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीसोबतच आणखी एका धातूची जोरदार चर्चा सुरू आहे. कमोडिटी एक्सपर्टही या धातूमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही धातू पुढीलगोल्डठरू शकते. आणि ती धातू म्हणजे तांबे होय.

advertisement

विशेष म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर तांब्याच्या किंमतींनी अक्षरशः आकाशाला गवसणी घातली आहे. आणि तांब्याशी संबंधित उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना प्रचंड नफा देत आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांसाठीमल्टीबॅगर’ ठरत आहेत.

advertisement

एक वर्षात 2400% परतावा देणारा शेअर

अशीच एक कंपनी आहे मार्डिया सॅमयॉन्ग कॅपिलरी ट्यूब्स कंपनी लिमिटेड (Mardia Samyoung Capillary Tubes Company Ltd), ज्याने केवळ एका वर्षात तब्बल 2400% पेक्षा जास्त मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. ही कंपनी तांब्याच्या ट्यूब्स आणि इलेक्ट्रिक गॅजेट्समध्ये वापरले जाणारे घटक तयार करते.

advertisement

आता प्रश्न असा की ही कंपनी किती जुनी आहे? नेमके काय काम करते? तिची कामगिरी कशी आहे? आणि या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत की नाही? हे समजून घेऊया.

1 लाख झाले 25 लाख रुपये

advertisement

मार्डिया सॅमयॉन्ग कॅपिलरी ट्यूब्स कंपनी लिमिटेड ही महाराष्ट्रातील स्मॉल कॅप कंपनी असून, तिचा शेअरपेनी स्टॉक’ म्हणून ओळखला जातो. कंपनीचे मार्केट कॅप 61.4 कोटी रुपये आहे आणि ती BSE वर लिस्टेड आहे.

एक वर्षापूर्वी या कंपनीचा एक शेअर 3.57 इतका होता, तर सध्या त्याची किंमत 88.2 पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी यात 1 लाख गुंतवले असते, तर आज त्याची किंमत सुमारे 24.9 लाख झाली असती. कंपनीने एका वर्षात तब्बल 2,390% परतावा दिला आहे.

शेअरची सध्याची कामगिरी

सोमवारी MSCTC च्या शेअरमध्ये तब्बल 2% वाढ झाली आणि स्टॉक अपर सर्किटवर बंद झाला. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून हा शेअर दररोज ऑल-टाइम हाय बनवत आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक 88.2 आणि किमान स्तर 7.59 आहे. सध्या हा शेअर आपल्या बुक व्हॅल्यूपेक्षा 10.9 पट अधिक दराने ट्रेड होत आहे.

कंपनीचा इंटरेस्ट कव्हरेज रेशो कमी आहे. मागील तीन वर्षांमध्ये कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी (ROE) 3.32% इतका राहिला आहे. सध्याचा ROCE (Return on Capital Employed) 22.6% आणि ROE (Return on Equity) 24.4% आहे.

कंपनी काय काम करते?

मार्डिया सॅमयॉन्ग कॅपिलरी ट्यूब्स कंपनी लिमिटेड ही मुंबई (महाराष्ट्र) येथील कंपनी असून तिची स्थापना 1992 साली झाली. ही कंपनी अलौह (non-ferrous) धातूंवरील उत्पादने तयार करते आणि त्यांचा व्यापार करते.कंपनी कॉपर, स्टेनलेस स्टील, पितळ (Brass) आणि इतर मिश्रधातूंमधून बनवलेल्या लहान व्यासाच्या, पातळ भिंतींच्या ट्यूब्सचे उत्पादन करते.

गुंतवणूक करावी की नाही?

तज्ज्ञांचे मत असे आहे की, जर तुम्ही लाँग टर्म इन्वेस्टमेंट (दीर्घकालीन गुंतवणूक) करू इच्छित असाल, तर पेनी स्टॉक्सपासून दूर राहणे श्रेयस्कर आहे. परंतु जर तुम्ही जोखीम घेऊ शकता, तर अल्पावधीत 10% नफा बुक करून बाहेर पडणे हा पर्याय चांगला ठरू शकतो.

Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.

मराठी बातम्या/मनी/
महाराष्ट्रातल्या छोट्या कंपनीचा मोठा पराक्रम, मार्केटमध्ये धूम; 1 लाखाचे झाले 25 लाख, दररोज ‘अपर सर्किट’ लागतोय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल