नवा बदल
पूर्वी, EPFO सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी बँक खात्याशी संलग्न चेक किंवा पासबुकची प्रत अपलोड करावी लागत असे. त्या खात्याची नियोक्त्याकडून पडताळणी करून घ्यावी लागत असे. पण आता या दोन्ही गोष्टी करण्याची गरज लागणार नाही. यामुळे कर्मचारी सोप्या पद्धतीने आणि लवकर त्यांचा पीएफ काढू शकतील.
चीनकडून सोन्याबद्दल जगाला हादरवून टाकणारी घोषणा; बाजारात मोठी उलथापालथ होणार
advertisement
फायदे
-8 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना त्वरित लाभ मिळेल.
-पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होईल.
-नियोक्त्यांवरील पडताळणीची जबाबदारी कमी होईल.
-EPFO च्या डिजिटल सेवेचा अधिकाधिक लोकांना फायदा मिळेल.
ही सुविधा केव्हा लागू झाली?
ही सुधारणा 28 मे 2024 रोजी काही निवडक KYC-अपडेटेड सदस्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. त्या काळात 1.7 कोटींहून अधिक EPFO सदस्यांनी या सुविधेचा यशस्वी लाभ घेतला. आता ही सुविधा सर्व EPFO सदस्यांसाठी लागू करण्यात आली आहे.
सरकारने केली मोठी घोषणा, 6 कोटी खातेदारांना मिळाली गुड न्यूज; सुविधा केली मोफत
EPFO म्हणजे काय आणि त्याचे कार्य?
EPFO (Employees’ Provident Fund Organisation) हे भारत सरकारचे एक महत्त्वाची संघटना आहे. जी देशातील कर्मचार्यांच्या भविष्य निधीचे व्यवस्थापन करते. हे श्रम व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
प्रमुख योजना
भविष्य निधी (PF): कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम कपात करून PF खात्यात जमा केली जाते आणि नियोक्ताही त्यात योगदान देतो.
पेंशन योजना (EPS): निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मासिक पेंशन मिळते.
विमा योजना (EDLI): कर्मचारी मृत्यूप्रसंगी त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते.
ऑनलाइन सेवा: EPFO सदस्यांना पीएफ बॅलन्स तपासणे, पीएफ ट्रान्सफर करणे आणि पीएफ काढण्याची सुविधा ऑनलाइन मिळते.
युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN): प्रत्येक EPFO सदस्याला एक UAN दिला जातो. ज्याद्वारे तो आपली PF माहिती ऑनलाइन सहज पाहू शकतो.
सरकारचा उद्देश
श्रम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की हा बदल EPFO सदस्यांसाठी ‘जीवन सुलभता’ आणि नियोक्त्यांसाठी ‘व्यवसाय सुलभता’ यासाठी करण्यात आला आहे. यामुळे कर्मचारी त्यांच्या पीएफ निधीवर अधिक नियंत्रण मिळवू शकतील आणि आवश्यकतेनुसार तो सहज काढू शकतील.
नव्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!
हा बदल म्हणजे EPFO सदस्यांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे, कारण यामुळे त्यांना त्यांच्या कठीण प्रसंगी त्वरित निधी उपलब्ध होऊ शकतो. EPFO च्या या नव्या निर्णयामुळे कर्मचारी आणि नियोक्ते दोघांनाही सोप्या आणि जलद सेवांचा फायदा मिळणार आहे.