या करारातील महत्त्वाचे मुद्दे:
- सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (SMBC) यस बँकेतील 51% (नियंत्रणकारी हिस्सेदारी) खरेदी करण्याच्या तयारीत आहे.
-SMBC हा करार तीन टप्प्यांमध्ये पूर्ण करू शकते.
शेअर बाजारात 4 वर्षानंतर असा दिवस उगवला; गुंतवणुकदारांनी कमावले 16 लाख कोटी
पहिला टप्पा: SBI कडून 13% हिस्सेदारी खरेदी करणे (SBI ची एकूण हिस्सेदारी 24% आहे).
advertisement
पुढील लक्ष्य: सप्टेंबर 2025 पर्यंत 20% अतिरिक्त हिस्सेदारी मिळवणे.
मतदानाचा अधिकार: SMBC ने सहमती दर्शविली आहे की त्यांचे मतदानाचा अधिकार 26% पर्यंत मर्यादित राहील.
-RBI कडून या प्रक्रियेसाठी 90 दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.
-ऑगस्ट-सप्टेंबर 2025 पर्यंत SMBC ला सर्व नियामक मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
-आर्थिक वर्ष 2026 च्या सुरुवातीपर्यंत SMBC चा बँकेवर नियंत्रण येऊ शकते.
यस बँकेत SMBC प्राथमिक भांडवल गुंतवणूक करेल. यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांची हिस्सेदारी 26% पर्यंत पोहोचू शकते. त्यानंतर ओपन ऑफर आणला जाईल ज्यामध्ये Advent International (9.2%) आणि Carlyle (6.84%) सारखे सध्याचे गुंतवणूकदार भाग घेऊ शकतात. SBI देखील आपली उर्वरित 10% हिस्सेदारी याच ऑफरमध्ये विकू शकते. LIC ची हिस्सेदारी 3.98% आहे आणि ती देखील आपली हिस्सेदारी विकू शकते.
यस बँकेला SMBC द्वारे खरेदी करणे
यस बँकेला SMBC द्वारे खरेदी करणे हे भारतीय बँकिंग क्षेत्रातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या विदेशी नियंत्रित करारांपैकी एक ठरू शकते. हे केवळ यस बँकेसाठीच नव्हे तर भारत आणि जपान यांच्यातील वित्तीय संबंधांसाठी देखील एक नवीन अध्याय असेल.
