TRENDING:

FASTag Annual Pass: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, अटल सेतू, समृद्धी महामार्ग सोडून महाराष्ट्रात कुठे चालणार पास? पाहा संपूर्ण लिस्ट

Last Updated:

FASTag वार्षिक पास महाराष्ट्रात आजपासून लागू झाला आहे. 3000 रुपयांत खरेदी करून 7000 रुपये वाचवू शकता. हा पास राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर चालणार आहे.

advertisement
Fastag Annual Pass: फास्टॅगचा अॅन्युअल पास मिळण्याची सुविधा आजपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात आजपासून हा पास मिळणार आहे. हा पास तुम्ही 3000 रुपयांमध्ये काढून 7000 रुपये वाचवू शकता. हा पास राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय एक्सप्रेस वेवर चालणार आहे. याशिवाय खासगी वाहनांसाठी हा पास असेल. ट्रान्सपोर्ट किंवा एसटी बससाठी हा पास वापरता येणार नाही.
फास्टॅग
फास्टॅग
advertisement

 महाराष्ट्रात कुठे चालणार? कसा मिळवणार?

भारत सरकारने प्रवाशांच्या सोयीसाठी FASTag वार्षिक पास ही नवीन सुविधा सुरू केली आहे. आजपासून लागू झालेल्या पासमुळे कार, जीप आणि व्हॅनसारख्या खाजगी वाहनांना टोल नाक्यांवर कमी खर्चात प्रवास करणे शक्य होणार आहे. पण महाराष्ट्रातील काही प्रमुख महामार्गांवर हा पास लागू होणार नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

advertisement

PM Modi Speech : 'यंदाच्या दिवाळीत देशाला मोठं गिफ्ट', लाल किल्ल्यावरून PM मोदींची मोठी घोषणा

महाराष्ट्रा कुठे चालणार नाही पास?

महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे महामार्ग मुंबई सातारा, मुंबई पुणे एक्सप्रेस वे, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, वरळी सी लिंक यापैकी कुठेही हा वार्षिक पास चालणार नाही हे सरकारने स्पष्ट केलं. महाराष्ट्रात एकूण 87 टोल आहेत त्यापैकी केवळ 17 टोलवर हा पास चालणार आहेत.

advertisement

महाराष्ट्रातील कोणत्या टोलवर पास चालणार हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

FASTag वार्षिक पास काय आहे?

हा एक विशेष पास आहे जो तुमच्या FASTag शी जोडला जातो. यामुळे एका वर्षासाठी किंवा २०० वेळा (यापैकी जे आधी पूर्ण होईल) टोल टॅक्स भरावा लागणार नाही. म्हणजेच, एकदा 3000 रुपये भरल्यानंतर तुम्ही वर्षभर टोलची चिंता न करता प्रवास करू शकता. मात्र, हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग (National Highway) आणि राष्ट्रीय एक्सप्रेसवे (National Expressway) वरच वापरता येईल.

advertisement

हा पास कसा आणि कधीपासून सुरू होणार?

हा पास तुम्ही आजपासून 'राजमार्गयात्रा' (Rajmargyatra) मोबाईल ॲप्लिकेशन किंवा NHAI च्या अधिकृत वेबसाइटवर सक्रिय करू शकता. यासाठी तुम्हाला 3000 शुल्क भरावे लागेल. तुमचा सध्याचा FASTag वैध असेल तर तुम्हाला नवीन खरेदी करण्याची गरज नाही.

पासची मुदत कधी संपेल?

हा पास सक्रिय केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० क्रॉसिंग (यापैकी जे आधी पूर्ण होईल) वैध राहील. एकदा ही मुदत संपली की, तुमचा FASTag आपोआप नियमित FASTag मध्ये रूपांतरित होईल आणि तुम्हाला टोलसाठी पैसे भरावे लागतील.

advertisement

मुदत संपल्यावर काय?

जर तुमच्या पासची मुदत संपली, तर तुम्ही नवीन पास काढू शकता. यासाठी तुम्हाला पुन्हा 'राजमार्गयात्रा' ॲपवर जाऊन शुल्क भरावे लागेल. हा पास फक्त खाजगी, गैर-व्यावसायिक वाहनांसाठी उपलब्ध आहे आणि एका वाहनावरून दुसऱ्या वाहनावर हस्तांतरित करता येत नाही.

या नवीन सुविधेमुळे नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी टोलचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. हा पास राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय एक्सप्रेसवेवर वापरला जाऊ शकतो, तर अटल सेतू आणि समृद्धी महामार्ग हे राज्य महामार्ग आणि राज्याच्या स्थानिक प्राधिकरणांच्या अंतर्गत येतात.

मराठी बातम्या/मनी/
FASTag Annual Pass: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, अटल सेतू, समृद्धी महामार्ग सोडून महाराष्ट्रात कुठे चालणार पास? पाहा संपूर्ण लिस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल