PM Modi Speech : 'यंदाच्या दिवाळीत देशाला मोठं गिफ्ट', लाल किल्ल्यावरून PM मोदींची मोठी घोषणा
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
PM Modi Announcement : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले.
नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्यावरून ठणकावताना देशाच्या प्रगतीचा वाटचाल सांगितली. यंदाच्या दिवाळीत देशवासियांना मोठं गिफ्ट देणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. त्यामुळे हे गिफ्ट काय असणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आत्मनिर्भर भारतावर जोर देताना स्वदेशीचे महत्त्व अधोारेखित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, "एखादी व्यक्ती जितकी जास्त इतरांवर अवलंबून असते तितकेच त्याच्या स्वातंत्र्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. जेव्हा एखाद्याला अवलंबून राहण्याची सवय लागते तेव्हा ते दुर्दैवी ठरते. आपण स्वावलंबन कधी सोडतो आणि कधी आपण कोणावर अवलंबून राहतो हे आपल्याला कळत नाही, असेही त्यांनी सांगितले. स्वदेशी हे हतबलता, नाईलाज म्हणून नव्हे तर मजबुतीचा दृढनिश्चय आहे. व्यापाऱ्यांनी देखील दुकानावर स्वदेशी वस्तू विकत असल्याचे फलक लावावे असे आवाहन त्यांनी केले.
advertisement
दिवाळीत मोठं गिफ्ट...
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात यंदाच्या दिवाळीत देशवासियांना मोठं गिफ्ट देणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात जीएसटीचा कर दराबाबत सूतोवाच केले. जीएसटी लागू होऊन आठ वर्ष झाल्यानंतर आता त्याचा आढावा घेण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. त्यामुळे दिवाळीत आता कररचनेबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
advertisement
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की़, "मी दिवाळीला एक गिफ्ट देणार आहे. गेल्या 8 वर्षात आम्ही जीएसटीमध्ये मोठी सुधारणा केली, कर सुलभ केला. आता आढावा घेणे ही काळाची मागणी आहे, आम्ही राज्यांशीही बोललो, आम्ही पुढील पिढीतील जीएसटी सुधारणा आणत आहोत, असे पंतप्रधानांनी म्हटले.
नागरिकांना द्यावे लागणारे कर मोठ्या प्रमाणात कमी केले जातील. ज्यामुळे लघु उद्योग आणि एमएसएमईंना फायदा होईल, तर दैनंदिन वापरातील उत्पादने स्वस्त होतील, असे त्यांनी लाल किल्ल्यारून देशाला संबोधित करताना सांगितले.
advertisement
आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, गेल्या दशकात सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन या गोष्टींचा समावेश होता; आता आपल्याला आणखी मोठ्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. 21व्या शतकासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुधारणा कालबद्ध पद्धतीने शिफारस करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केला जाईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
August 15, 2025 8:50 AM IST
मराठी बातम्या/देश/
PM Modi Speech : 'यंदाच्या दिवाळीत देशाला मोठं गिफ्ट', लाल किल्ल्यावरून PM मोदींची मोठी घोषणा