TRENDING:

मोठा दिलासा! या तारखेपर्यंत फ्रीमध्ये अपडेट करता येणार Aadhaar Card

Last Updated:

UIDAI ने मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. आता आधार धारक पुढील 90 दिवस कोणत्याही फीसशिवाय त्यांची माहिती ऑनलाइन अपडेट करू शकतात.

advertisement
नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 14 सप्टेंबर 2024 होती, ती आता 14 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आधार धारक आता आधारमध्ये टाकलेली माहिती पुढील 90 दिवस कोणतेही शुल्क न घेता ऑनलाइन अपडेट करू शकतात. मात्र, ही सेवा केवळ ऑनलाइन उपलब्ध आहे. आधार केंद्रावर जाऊन तुम्हाला कोणतीही माहिती अपडेट करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
Aadhaar Card अपडेट
Aadhaar Card अपडेट
advertisement

UIDAI च्या अधिकृत वेबसाइटनुसार, आधार कार्डधारक आता 14 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन माहिती मोफत अपडेट करू शकतात. आजच्या काळात, आधार हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे, ज्याचा उपयोग सरकारी योजना, बँक अकाउंट उघडणे, रेल्वे आणि विमान तिकीट बुकिंगसह अनेक कामांमध्ये केला जातो. प्रत्येक व्यक्तीचे नाव, पत्ता, वय, लिंग आणि बायोमेट्रिक डेटा यासारखी लोकसंख्याविषयक माहिती आधार कार्डमध्ये नोंदवली जाते.

advertisement

आधार अपडेट करणे अनिवार्य आहे का?

आधार अपडेट करणे बंधनकारक नाही. UIDAI ने अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, आधार अपडेट करणे आवश्यक नाही. मात्र, जर आधार कार्ड जुने असेल तर ते अपडेट करणे फायदेशीर ठरू शकते. UIDAI ने सुचवले आहे की ओळख आणि पत्त्याच्या पुराव्याशी संबंधित कागदपत्रे अपडेट करणे उचित ठरेल. तुमच्या आधारमध्ये जुना पत्ता किंवा फोटो असल्यास ते अपडेट करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. परंतु, तुम्ही तुमचे 10 वर्ष जुने आधार अपडेट केले नाही तरीही तुमचे आधार कार्ड पूर्वीप्रमाणेच काम करत राहील आणि ते ब्लॉक किंवा निलंबित केले जाणार नाही.

advertisement

पुढच्या वर्षी बंद होणार Post Office ची सुपरहिट स्कीम, तुम्ही पैसे गुंतवले की नाही?

आधार अपडेट पद्धती

आधार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अपडेट करता येतो. म्हणजेच तुमच्या आधारमध्ये टाकलेली कोणतीही चुकीची माहिती तुम्ही आधार केंद्रात जाऊन दुरुस्त करू शकता. याशिवाय तुम्ही घरी बसून आधार ऑनलाइन मोफत अपडेट करू शकता.

advertisement

याप्रमाणे आधार ऑनलाइन अपडेट करा

-UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा.

-मोबाईल नंबर टाकून OTP मिळवा आणि OTP टाकून लॉगिन करा.

-तुमचे सर्व डिटेल्स जसे की पत्ता इ. तपासा.

-कोणतीही माहिती चुकीची असल्यास, ती बदलण्याचा ऑप्शन निवडा.

-माहिती अपडेट करण्यासाठी, आवश्यक डॉक्यूमेंट प्रूफ अपलोड करा.

-यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

advertisement

-तुम्हाला 14 अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) नंबर मिळेल. याच्या मदतीने तुम्ही आधार -अपडेटच्या प्रक्रियेला ट्रॅक करु शकता.

मराठी बातम्या/मनी/
मोठा दिलासा! या तारखेपर्यंत फ्रीमध्ये अपडेट करता येणार Aadhaar Card
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल