पुढच्या वर्षी बंद होणार Post Office ची सुपरहिट स्कीम, तुम्ही पैसे गुंतवले की नाही?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पुढच्या वर्षी बंद होणार महिलांसाठीची सरकारी योजना; आता गुंतवणूक केल्यास मिळेल 7.5 टक्के व्याज
मुंबई : केंद्र सरकारने महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी 2023 मध्ये महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट नावाची योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे महिलांना गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि आकर्षक पर्याय मिळतात. ही दोन वर्षांची अल्पबचत योजना आहे. या योजनेत महिला किंवा मुलीच्या नावे कमाल दोन लाख रुपये आणि किमान 1000 रुपये गुंतवता येतात. 7.5 टक्के चक्रवाढ व्याज मिळणारी ही योजना फक्त पुढच्या वर्षीपर्यंत आहे. नंतर ही योजना बंद केली जाणार आहे.
2023च्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली होती. ही योजना फक्त मार्च 2025पर्यंत उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अकाउंट कसं चालू करायचं ते जाणून घेऊ या.
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेसाठी अकाउंट कसं उघडायचं?
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेसाठी अकाउंट उघडण्यासाठी मुलीचं वय किमान 18 वर्षं असावं लागतं. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाचं अकाउंट उघडता येतं; पण ते अकाउंट मुलीचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक चालू करू शकतात. या योजनेत तुम्ही पोस्ट ऑफिसमधून गुंतवणूक करू शकता. अकाउंट चालू करण्यासाठी महिलांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो लागतात.
advertisement
मुदतीआधी काढता येते रक्कम
या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड दोन वर्षांचा असतो. यात गुंतवणूक केल्यावर दोन वर्षं पूर्ण व्हायच्या आधी थोडी रक्कम काढता येते. तुम्ही गुंतवलेल्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम तुम्ही एका वर्षानंतर काढू शकता. तुम्ही तुमच्या महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत दोन लाख रुपये गुंतवले असतील, तर त्यापैकी 80 हजार रुपये एक वर्षानंतर काढता येतील.
advertisement
या योजनेत गुंतवणूक केल्यावर किती परतावा मिळतो
महिलांनी महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत 50 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास त्यांना या गुंतवणुकीवर दोन वर्षांच्या कालावधीत व्याज म्हणून 8011 रुपये मिळतात. दोन वर्षांनी तुम्हाला 58,011 रुपयांचा परतावा मिळेल. तसंच तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 1,16,022 रुपये मिळतील. 16 हजार 22 रुपये हे त्यावरचं व्याज असेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2024 6:01 AM IST
मराठी बातम्या/मनी/
पुढच्या वर्षी बंद होणार Post Office ची सुपरहिट स्कीम, तुम्ही पैसे गुंतवले की नाही?


