IND vs SA Final : रोहित-विराट बक्कळ कमावतात, पण स्मृती हरमनप्रीतला एका सामन्याचे किती पैसे मिळतात?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियासाठी मैदानात घाम गाळणाऱ्या या वाघिणींना रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या तुलनेत किती पैसै मिळतात? हे जाणून घेऊयात.
India vs South Africa Final World Cup 2025 : आयसीसी वुमेन्स वर्ल्डकप स्पर्धेत उद्या 2 नोव्हेंबर 2025 ला भारत आणि साऊथ आफ्रिका संघात फायनलचा सामना पार पडणार आहे. या सामन्याला नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर दुपारी 3 वाजताच्या सुमारास सुरूवात होणार आहे.या सामन्यात टीम इंडियाची महिला स्टार खेळाडू स्मृती मानधना,हरमनप्रीत कौर आणि जेमीमा रॉड्रिक्स या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. पण टीम इंडियासाठी मैदानात घाम गाळणाऱ्या या वाघिणींना रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या तुलनेत किती पैसै मिळतात? हे जाणून घेऊयात.
खेळाडूंना किती मॅच फी मिळते ?
भारतीय महिला संघाच्या खेळाडूंना कसोटीसाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात. भारताच्या पुरूष खेळाडूंना देखील इतकीच रक्कम मिळते. त्यामुळे भारतीय महिला संघाला पुरुष संघाइतकेच मॅच फी मिळते. या निर्णयाची अंमलबजावणी
2022 मध्ये तत्कालीन बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केली होती.
advertisement
आता ही झाली मॅच फी ची गोष्ट.पण केंद्रीय करार (Central Contract) यादीत सर्वात मोठा फरक आहे.कारण मानधना आणि हरमनप्रीतचे वार्षिक उत्पन्न विराट आणि रोहितच्या जवळपासही नाही.
2024-2025 या कालावधीसाठी, विराट, रोहित, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना A+ श्रेणीत ठेवण्यात आले होते.तर महिला संघासाठी A+ श्रेणीच नाही. महिला संघासाठी सर्वात मोठा श्रेणी म्हणजे A श्रेणी, ज्यामध्ये फक्त तीन क्रिकेटपटू आहेत, स्मृती, हरमनप्रीत आणि दीप्ती शर्मा.
advertisement
बीसीसीआयच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, ए+ श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी रुपये मिळतात, तर ए, बी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे 5 कोटी रुपये, 3 कोटी रुपये आणि 1 कोटी रुपये मिळतात. महिला संघाच्या बाबतीत, ए श्रेणीतील खेळाडूंना 50 लाख रुपये मिळतात, तर बी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना 30 लाख रुपये आणि 10 लाख रुपये मिळतात.
advertisement
भारताचा महिला संघ 2005 आणि 2017 ला वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. पण टीम इंडियाला फायनल जिंकता आली नव्हती. आता टीम इंडियाला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. तर साऊथ आफ्रिका पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे.त्यामुळे त्यांना देखील पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. आता या दोघांमधून कोणता संघ फायनल सामना जिंकतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 7:19 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA Final : रोहित-विराट बक्कळ कमावतात, पण स्मृती हरमनप्रीतला एका सामन्याचे किती पैसे मिळतात?


