TRENDING:

Gold Rate Today : 'बाईsss..हा काय हा प्रकार', लगीनघाई आधीच सोन्याने कहरच केला,आजचा भाव काय?

Last Updated:

सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे.ही उसळी इतकी मोठी आहे की सर्वसामान्यांच्या अवाक्याहबाहेर गेली आहे.त्यामुळे लग्नाची तयारीत असलेली कुटुंबीय अडचणीत सापडली आहे.

advertisement
Gold Rate Today : जळगाव, प्रतिनिधी नितीन नांदुरकर : आजपासून जवळजवळ महिनाभरानंतर म्हणजेच तुळशी विवाहानंतर लग्नसराईला सूरूवात होणार आहे.त्यामुळे लगीनघाईला सुरूवात झाली आहे.पण याआधीच कुटुंबियांचे टेन्शन वाढलं आहे. कारण सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे.ही उसळी इतकी मोठी आहे की सर्वसामान्यांच्या अवाक्याहबाहेर गेली आहे.त्यामुळे लग्नाची तयारीत असलेली कुटुंबीय अडचणीत सापडली आहे. त्यामुळे सोन्याचे आजचे दर काय आहेत? हे जाणून घेऊयात.
Gold Rate Today
Gold Rate Today
advertisement

अमेरिकन बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी जळगावच्या सुवर्णनगरीत दररोज सोन्याचे भाव वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.आज शहरात 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 14 हजार 300 रूपये (जीएसटीसह) इतका नोंदवला गेला. अल्पावधीत भावामध्ये झालेली ही वाढ ग्राहकांसाठी धोक्याची घंटा असली तरी नवरात्र उत्सवाच्या तोंडावर सुवर्णनगरीतील सराफ बाजार मात्र ग्राहकांनी गजबजून गेलेला आहे.

advertisement

ग्राहकांकडून काही प्रमाणात वेट अँड वॉच ही भूमिका घेतली जात असली तरी नवरात्र,दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण तोंडावर आल्याने खरेदी टाळणे अनेकांसाठी शक्य नाही. त्यामुळे भाव वाढले तरी ग्राहकांचा ओघ कायम असल्याचे सुवर्ण व्यवसायिकांनी सांगितले.

सोन्याचे भाव खूपच वाढले आहेत. आणि हे भाव आता आमच्या अवाक्याबाहेर चालले आहेत.त्यामु्ळे सर्वसामान्यांना सोनं घेणे आता परवडत नाही आहे.आम्ही जरी आज सोने घेण्यासाठी आलो असलो तरी आम्ही रिकामे हातच चाललोय कारण आमच्या बजेटमध्ये काहीच बसल नसल्याचे ग्राहक सुनिता पाटील यांनी सांगितले आहे.

advertisement

सातत्याने सोन्याचे भाव वाढतायत,याचं मुख्य कारण जीओ पॉलिटीकल टेन्शन आणि रशिया युक्रेनच्या युद्धामुळे सोन्याचे भाव वाढतायत. दुसरं कारण इंटरेस्ट रेट कमी झाले आणि येणाऱ्या महिन्यात ते आणखी कमी होतील, या अफवेमुळे सोन्याने उसळी घेतली आहे. अमेरीकेच्या टॅरिफमुळेही सोन्याचे भाव वाढतायत,असे सोने व्यावसायिक यांनी सांगितले आहे.

सोन्याचे भाव कमी होणार का?

advertisement

जळगावमधील अग्रगण्य सुवर्णव्यवसायिकांच्या मते, अमेरिकन व्याजदर कपातीमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील या चढउतारांचा थेट परिणाम जळगाव बाजारपेठेवर होत असून, भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/मनी/
Gold Rate Today : 'बाईsss..हा काय हा प्रकार', लगीनघाई आधीच सोन्याने कहरच केला,आजचा भाव काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल