>> सोन्याच्या किमतीत मोठी घसरण
२४ कॅरेट सोन्याची किंमत आज ₹1,003 ने घसरून ₹1,22,881 प्रति 10 ग्रॅम झाली आहे. जीएसटीसह किंमत आता ₹1,26,567 प्रति 10 ग्रॅम इतकी झाली आहे. गेल्या 17 ऑक्टोबर रोजी सोन्याने ₹1,30,874 इतका सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सोने आता ₹7,993 ने स्वस्त झाले आहे.
>> कॅरेटनुसार सोन्याचा दर काय?
advertisement
> २३ कॅरेट सोन्याची किंमतही ₹999 ने कमी होऊन ₹1,22,389 वर उघडली.
> २२ कॅरेट सोने ₹919 ने घसरून ₹1,12,559 प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
> १८ कॅरेट सोन्याचा भाव ₹752 ने कमी होऊन ₹92,161 झाला.
> १४ कॅरेटमध्ये मात्र किंमत बदल वेगळा असून ती ₹587 ने वाढून ₹71,885 वर पोहोचली आहे.
> चांदीचे भावही घसरले
चांदीची किंमत आज जीएसटीशिवाय ₹2,280 ने घसरून ₹1,55,840 प्रति किलो वर उघडली. जीएसटीसह ती ₹1,60,515 प्रति किलो इतकी झाली आहे.
१४ ऑक्टोबर रोजी चांदीची किंमत ₹1,78,100 प्रति किलो या सर्वोच्च पातळीवर होती. त्या तुलनेत चांदी आज ₹22,460 ने खाली आली आहे.
> IBJA कडून दिवसातून दोनदा दर जाहीर
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दररोज दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता दर जाहीर करते. या वर्षी सोने 47,141 ने वाढले, तर चांदी 69,823 ने महागली आहे.
> शहरानुसार दरात फरक
IBJA दर हे बेसिक स्पॉट रेट असतात. तुमच्या शहरात हे दर ₹1,000 ते ₹2,000 पर्यंत कमी–जास्त असू शकतात, असा IBJA ने स्पष्ट केले आहे.
