जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. २९ जानेवारीच्या सकाळी सोन्याच्या किमतीत प्रचंड उसळी पाहायला मिळाली असून राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,75,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. जागतिक बाजारपेठेत डॉलर कमकुवत झाल्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरवाढीवर झाला आहे. अमेरिकन डॉलर गेल्या ४ वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर आला आहे.
advertisement
डॉलर घसरल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याला पसंती दिली आहे. अमेरिकेच्या 'फेडरल रिझर्व्ह'ने व्याजरद 3.50% - 3.75% या मर्यादेत स्थिर ठेवले आहेत. अर्थव्यवस्थेतील मजबुती आणि महागाईच्या जोखमीमुळे तातडीने कपात न करण्याचे संकेत दिल्याने सोन्यात तेजी आली आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, आज चांदी चार लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीला मोठा फायदा मिळत आहे.
| शहर | 22 कॅरेट सोन्याचे दर | 24 कॅरेट सोन्याचे दर |
| दिल्ली | 153310 | 167240 |
| मुंबई | 153160 | 167090 |
| अहमदाबाद | 153210 | 167140 |
| चेन्नई | 153160 | 167090 |
| कोलकाता | 153160 | 167090 |
| हैदराबाद | 153160 | 167090 |
जागतिक विश्लेषकांच्या मते सोन्यातील ही तेजी थांबणारी नाही. 'सोसायट जनरल नुसार वर्षाच्या अखेरीस सोने ६,००० डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचू शकते, तर मॉर्गन स्टेनलीने ही किंमत ५,७०० डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. लोक आता सोन्या चांदीच्या दागिन्यांऐवजी, शेअर मार्केट, ETF आणि म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावत आहेत. गेल्या वर्षापासून सोन्या-चांदीने सर्वात मोठा नफा ग्राहकांना मिळवून दिला आहे.
