TRENDING:

LPG सिलेंडर बुक करताना सावधान! एका चुकीने रिकामं होतंय बँक अकाउंट, अलर्ट जारी 

Last Updated:

LPG Cylinder Booking Scam: देशभरात एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य लोकं हे चिंतेत आहेत. असं असताना आता स्कॅमर्सने सर्वांची चिंता आणखी वाढवलीये. कारण स्कॅम लोकांना फसवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधत आहेत.

advertisement
मुंबई : आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. देशातील काही भागांमध्ये गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी लोकांना खुपच मेहनत करावी लागते. काही लोकं तासंतास रांगेत उभे राहत आहेत. तर काही लोकांना बुकिंग केल्यानंतर 8 दिवसांनंतर सिलेंडर मिळतंय. हे सर्व सुरू असताना स्कॅमर्सने संकटात संधी शोधलीये. कारण सध्या लोकं गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सिलेंडर मिळणार की नाही या चिंतेत असताना स्कॅमर्स त्यांचा फायदा घेताय.
एलपीजी बुकिंग स्कॅम अलर्ट
एलपीजी बुकिंग स्कॅम अलर्ट
advertisement

LPG Booking चा ऑनलाइन स्कॅम सुरू 

इंटरनेटवर गॅस सिलेंडर बुकिंग अ‍ॅपच्या नावाने हजारो अ‍ॅप्स आहेत. अ‍ॅप्ससोबतच वेबसाइट लिंक आणि हेल्पलाइन नंबर्स उपलब्ध आहेत. सध्याच्या दिवसात लोक गॅस सिलेंडर बुकिंग करताना जास्त विचार न करता प्रयत्न करत आहेत. याच घाईचा फायदा घेत स्कॅमर्स सर्वसामान्य लोकांची फसवणूक करताय. नुकतेच गॅस सिलेंडर बुकिंगच्या नावाने फसवणूक करण्याची प्रकरण समोर आली आहेत. याविषयीच केंद्र सरकारच्या सायबर सिक्योरिटी एजेंसी I4C ने अलर्ट जारी केलाय. जेणेकरून लोक सावध राहतील.

advertisement

LPG Price Hike: महागाईचा भडका उडाला, व्यावसायिक एलपीजी पाठोपाठ ५ किलोचा सिलिंडरही झाला महाग, किती रुपयांनी झाली दरवाढ?

भीती आणि घाईचा फायदा घेताय स्कॅमर्स 

भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने देशभरात वाढत असलेल्या एलपीजी बुकिंग स्कॅमविषयी अलर्ट जारी केलाय. अधिकारी म्हणतात की, स्कॅमर्स लोकांच्या मनात सिलेंडरच्या कमतरतेची भीती निर्माण करत आहेत. ते सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप आणि एसएमएसच्या माध्यमातून लोकांना घाई-घाईत पेमेंट करण्यास सांगतात. ते बुकिंगसाठी फेक लिंक देतात आणि घाबरवतात की, जर तुम्ही लवकर पेमेंट केलं नाही तर सिलेंडर मिळवण्याची संधी हुकून जाईल.

advertisement

कसं केलं जातं सिलेंडर बुकिंग स्कॅम 

  • तुम्हाला आधी मेसेज पाठवला जातो की, स्टॉक मर्यादित आहे. लगेच बुकिंग करा अन्यथा सिलेंडर मिळणार नाही.
  • यासोबतच कमी किंमत किंवा मोठ्या डिस्काउंटचं आमिष दाखवलं जातं.
  • मेसेजमध्ये एक लिकं असते, जी गॅस कंपनीच्या खऱ्या वेबसाइटसारखी दिसते.
  • advertisement

  • अनेकदा स्कॅमर्स तुमच्याकडून अनोळखी अॅप (APK फाइल)डाउनलोड करुन किंवा पेमेंटसाठी क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगतात.
  • तुम्ही या लिंक्सवर तुमचा माहिती टाकता किंवा ओटीपी शेअर करता, तेव्हा हॅकर्स तुमच्या बँक अकाउंटपर्यंत पोहोचतात.

LPG चा तुटवडा, पण PNG चालू! पाइप लाइनद्वारे येणारा गॅस येतो तरी कुठून? पाहाच

हे संकेत दिसल्यास व्हा अलर्ट 

  • एखाद्या मेसेजवर तुम्हाला एलपीजीचा तुटवडा असल्याचं सांगितलं जातं आणि बुकिंगसाठी दबाव टाकला जातो.
  • तुम्हाला लिंक किंवा अनोळखी वेबसाइटवर जाण्यास सांगितलं जातं.
  • तुम्हाला फोनमध्ये एखादं अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितलं जातं किंवा पिन मागितला जातो.

मराठी बातम्या/मनी/
LPG सिलेंडर बुक करताना सावधान! एका चुकीने रिकामं होतंय बँक अकाउंट, अलर्ट जारी 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल