TRENDING:

Aadhaar Card : तुमच्या आधार कार्डावरून कोणी सिम कार्ड घेतलंय का? असं करा चेक

Last Updated:

तुमच्या आधार (Aadhar) नंबरवर अनेक फर्जी मोबाईल नंबर रजिस्टर्ड करण्यात आलेले असू शकतात. कधीकधी आपण सिम विकत घेताना दिलेल्या कागदपत्रांचा गैरफायदा देखील घेतला जाऊ शकतो.

advertisement
मुंबई : आधार कार्ड (Aadhar Card) हे भारतीयांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं डॉक्युमेंट झालं आहे. त्याचा वापर दिवसेंदिवस वाढत असून, कोणत्याही सरकारी योजनाचे लाभ घ्यायचा असू दे किंवा साधं प्रवासाचं तिकीट बूक करायचं असू दे सोबत आधार कार्ड लागतंच. आधारचा वापर जसजसा वाढलाय, तसतशा आधारशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे तुमची आधारशी संबंधित माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.
आधार कार्ड
आधार कार्ड
advertisement

सध्या मोबाईलसाठी सिमकार्ड (Mobile Sim Card) घ्यायचं असेल तरी आधार कार्ड लागतं. अनोळखी व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड वापरून मोबाईलचं सिम घेऊन फसवणूक केल्याच्या घटनाही वाढत आहेत. आर्थिक आणि इतर गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार इतरांच्या नावावर घेतलेल्या सिमकार्डचा वापर करतात. त्यामुळेच आपल्या आधार कार्डवर कोणीही फसवणूक करून मोबाईल सिम तर नाही घेतलं ना, याची खात्री करणं महत्वाचं आहे.

advertisement

तुमच्या आधारशी किती मोबाइल सिम लिंक आहेत, याचा शोध घेणं अगदी सोपं आहे. तुम्ही काही मिनिटांत तुमच्या स्मार्टफोनवर ते शोधू शकता. तुमच्या आधार क्रमांकावर किती सिम अ‍ॅक्टिव्हेट आहेत, हे शोधण्यासाठी सरकारने एक पोर्टल तयार केलं आहे.

Aadhaar Card मध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा? ही आहे सोपी प्रोसेस

याला टेलिकॉम अॅनॅलिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) असं नाव देण्यात आलं आहे. या पोर्टलद्वारे, युजर्स त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले सर्व फोन नंबर तपासू शकतात.

advertisement

या पोर्टलवर तुम्ही केवळ तुमच्या आधार लिंक झाल्याची माहितीच मिळवू शकत नाही, तर तुमच्या नकळत कोणताही मोबाइल क्रमांक तुमच्या आधार क्रमांकाशी जोडला गेला असेल, तर तुम्ही त्याबद्दल तक्रारही करू शकता. एवढंच नाही तर तुम्ही तुमचा जुना आणि जो आता वापरत नाही असा फोन नंबर आधारशी अनलिंक करू शकता.

Most Expensive Tree: ना फळ देते ना लाडूक, उंची 2 फूट, तरीही कोट्यवधींमध्ये विकलं जातं हे झाडं; एवढं महाग का?

advertisement

पाहूया काय आहे प्रक्रिया

– सर्वात आधी https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर जा.

– तिथे दिलेल्या कॉलममध्ये तुमचा मोबाइल नंबर भरा.

– त्यानंतर ‘Request OTP’ बटणावर क्लिक करा.

– तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला OTP पोर्टलवर दिलेल्या ठिकाणी एंटर करा.

– तुमच्या आधार क्रमांकाशी संबंधित सर्व क्रमांक वेबसाइटवर दिसतील.

– येथे तुम्ही वापरात नसलेल्या किंवा या पुढे आवश्यक नसलेल्या नंबरची तक्रार करू शकता आणि ब्लॉक करू शकता.

advertisement

तुमच्या आधार नंबरवरून सिमकार्ड (SIM Card) घेत कोणीही इतरांची फसवणूक (Fraud) केल्यास तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे या वेबसाईटवर जाऊन तुमच्या आधार कार्डसोबत किती मोबाइल नंबर लिंक आहेत, याची तपासणी करून घ्या. नको असलेले नंबर ब्लॉक करा.

मराठी बातम्या/मनी/
Aadhaar Card : तुमच्या आधार कार्डावरून कोणी सिम कार्ड घेतलंय का? असं करा चेक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल