3 दिवसांत 8600 कार विक्री, 375 कोटींची सबसिडी
मोटर इलस्ट्रेटेडच्या अहवालानुसार कॅनडामध्ये जानेवारी महिन्यात इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) सबसिडी बंद होण्याआधीच टेस्लाने केवळ तीन दिवसांत 8600 हून अधिक कार विकल्या. या विक्रीतून कंपनीला तब्बल 375 कोटी रुपयांची सबसिडी मिळाली. टोरोंटोमधील एका शोरूममध्ये 11 जानेवारीला एका दिवसात 1200 कार विकल्या गेल्या आणि या शोरूमला 4 दशलक्ष डॉलर्स (33 कोटी रुपये) सबसिडी मिळाली.
advertisement
सरकारी चौकशी सुरू
EV सबसिडी बंद होण्याच्या 72 तास आधी सरकारने संकेत दिले होते. यानंतरच टेस्लाच्या विक्रीत अचानक वाढ झाली. त्यामुळे कॅनेडियन ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने सरकारकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सरकार टेस्लाच्या विक्रीचा डेटा तपासत असून, या घडामोडीत कोणतीही अनियमितता झाली का, हे शोधत आहे.
Cash कमवा, या शेअरने मंदीतही करोडपती केले; 6 रुपयांच्या Stock पाहा कुठे पोहोचला
युरोप आणि ऑस्ट्रेलियात टेस्लाच्या विक्रीत मोठी घसरण झाली आहे. तर दुसरीकडे, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेस्लाच्या विक्रीत मोठी घट झाली आहे.
जर्मनी – 76% घसरण
नेदरलँड – 24% घसरण
स्वीडन – 42% घसरण
फ्रान्स – 45% घसरण
इटली – 55% घसरण
स्पेन – 10% घसरण
ऑस्ट्रेलिया – 66% घसरण
चीनमध्ये उत्पादित टेस्ला कारची विक्री 49% घटली
पासपोर्ट नियमांत मोठा बदल, 1 ऑक्टोबरनंतर जन्मलेल्यांसाठी धक्का; नवे नियम असे
भारतामध्ये टेस्लाची एन्ट्री लवकरच
टेस्ला भारतात लवकरच प्रवेश करणार आहे. कंपनी मुंबईत शोरूम उघडणार असून, त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. भारतात भरती प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र, अमेरिका आणि भारतातील आयात शुल्कासंदर्भातील चर्चेवर अजूनही अंतिम तोडगा निघालेला नाही. अमेरिका भारताकडून EV गाड्यांवरील आयात कर शून्य करावा अशी मागणी करत आहे, पण भारत सरकार अद्याप या निर्णयावर पोहोचलेले नाही.