Passport Rules Change : पासपोर्ट नियमांत मोठा बदल, 1 ऑक्टोबरनंतर जन्मलेल्यांसाठी धक्का; नवीन नियम समजून घ्या
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Passport Rules Change: भारतीय पासपोर्ट नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता जन्मतारखेच्या प्रमाणासाठी ठराविक दस्तऐवजच स्वीकारले जातील. नवीन नियमांनुसार 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी केवळ अधिकृत जन्म प्रमाणपत्रच मान्य असेल.
नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टसंदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्यासाठी जन्मतारखेचा दाखला म्हणून स्वीकारल्या जाणाऱ्या कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की आता पासपोर्ट बनवण्यासाठी फक्त ही कागदपत्रे आवश्यक असतील. या व्यतिरिक्त, इतर कोणत्याही कागदपत्रांसह केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.मंत्रालयाने 24 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नवीन नियमांची अंमलबजावणी त्वरित केली जाईल.
२४ फेब्रुवारी रोजी परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत पासपोर्ट जारी करण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा सादर करण्याशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. 1 ऑक्टोबर 2023 किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलांसाठी जन्मतारीख प्रमाणित करण्यासाठी केवळ जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 अंतर्गत अधिकृत जन्म व मृत्यू नोंदणी अधिकारी, महानगरपालिका किंवा अन्य सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. याशिवाय कोणतेही इतर कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत.
advertisement
ऑक्टोबर 2023 पूर्वी जन्मलेल्यांसाठी हे कागदपत्र वैध असतील
जर एखाद्या व्यक्तीचा जन्म ऑक्टोबर 2023 पूर्वी झाला असेल, तर त्यांना जन्मतारीख प्रमाणित करण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र वापरण्याची परवानगी असेल:
अधिकृत जन्म प्रमाणपत्र: जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 अंतर्गत अधिकृत नोंदणी प्राधिकरण, नगरपालिकेने किंवा अन्य अधिकृत संस्थेने जारी केलेले प्रमाणपत्र.
advertisement
शाळेचे प्रमाणपत्र: मान्यताप्राप्त शाळेने दिलेले ट्रान्सफर किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. याशिवाय, मान्यताप्राप्त शैक्षणिक बोर्डाकडून जारी केलेले मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्रही वैध मानले जाईल.
पॅन कार्ड: आयकर विभागाने जारी केलेले पॅन कार्ड, ज्यावर अर्जदाराची जन्मतारीख नमूद असेल.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवा नोंद: सरकारी कर्मचारी असल्यास, संबंधित मंत्रालय किंवा विभागाने अधिकृतरित्या प्रमाणित केलेली सेवा नोंद किंवा पेन्शन आदेश.
advertisement
ड्रायव्हिंग लायसन्स: राज्य सरकारच्या परिवहन विभागाने जारी केलेले, ज्यावर अर्जदाराची जन्मतारीख नमूद असेल.
मतदार ओळखपत्र: भारत निवडणूक आयोगाने जारी केलेले, ज्यावर जन्मतारीख असणे आवश्यक आहे.
विमा पॉलिसी बॉण्ड: भारतीय जीवन विमा महामंडळ किंवा सार्वजनिक विमा कंपन्यांनी जारी केलेला, ज्यावर अर्जदाराची जन्मतारीख नमूद असेल.
advertisement
पासपोर्टसाठी अर्ज करण्याचा एकमेव मार्ग
विदेश मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, नवीन पासपोर्ट काढण्यासाठी किंवा जुन्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. याशिवाय कोणत्याही अन्य प्रक्रियेला मान्यता दिली जाणार नाही.
सध्या केवळ जन्मतारीख प्रमाणपत्रांसंबंधी नियम बदलण्यात आले आहेत. इतर कोणत्याही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी योग्य कागदपत्रांची पूर्तता करूनच प्रक्रिया सुरू करावी.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 08, 2025 6:31 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Passport Rules Change : पासपोर्ट नियमांत मोठा बदल, 1 ऑक्टोबरनंतर जन्मलेल्यांसाठी धक्का; नवीन नियम समजून घ्या