Saving Account वर मेंटेन करावं लागतं मिनिमम बॅलेन्स, जाणून घ्या SBI आणि ICICI बँकेचे नियम
नवीन नियमांमध्ये काय?
आयकर विभागाने कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या भाड्याच्या मोफत निवासाचे मूल्यांकन करण्यासाठी नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार, जिथे नियोक्त्याकडून कर्मचाऱ्यांना अनफर्निश निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते आणि अशा निवासस्थानाची मालकी कंपनीकडेच असते, तेव्हा त्याचे मूल्यांकन आता वेगळ्या पद्धतीने केले जाईल. नवीन नियमांनुसार, आता शहरी भागात ज्यांची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 40 लाखांपेक्षा जास्त आहे, तेथे HRA वेतनाच्या 10 टक्के असेल. यापूर्वी 2001 च्या जनगणनेनुसार ते 15 टक्के होते.
advertisement
पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेत बचत करणाऱ्यांनो करा हे काम, अन्यथा फ्रिज होईल अकाउंट
एकेएम ग्लोबल टॅक्स पार्टनरच्या अमित माहेश्वरी यांनी म्हटलं की, 'जे कर्मचारी पर्याप्त वेतन घेत आहेत आणि नियोक्त्याकडून मिळालेल्या घरात राहत आहेत. ते आता जास्त बचत करण्यात सक्षम होतील. कारण सुधारीत दरांसह त्यांचा टॅक्सेबल बेस आता कमी होत आहे. अशा वेळी त्यांच्या घराचे मूल्य आता कमी होईल आणि सॅलरीमध्ये वाढ होईल.' एएमआरजी अँड असोसिएट्सचे सीईओ गौरव मोहन यांच्या मते, एचआरएचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या टॅक्सेबल सॅलरीमध्ये कपात होईल, ज्यामुळे नेट टेक-होम सॅलरी वाढेल. यामुळे एकीकडे कर्मचार्यांची बचत वाढेल तर दुसरीकडे सरकारचा महसूल कमी होईल.