पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेत बचत करणाऱ्यांनो करा हे काम, अन्यथा फ्रिज होईल अकाउंट

Last Updated:

अर्थ मंत्रालयाने पीपीएफ, एनएससी आणि अन्य बचत योजनांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड अनिवार्य केले आहे.

स्मॉल सेव्हिंग स्किम
स्मॉल सेव्हिंग स्किम
मुंबई, 3 सप्टेंबर: मुला-मुलींचे शिक्षण, विवाह, आपत्कालीन वेळी पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी बचत करणे गरजेचे असते. अनेक लोक यादृष्टीने आर्थिक नियोजन करत असतात. सरकारने लोकांची ही गरज लक्षात घेत पीपीएफ, सीनिअर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्किम आणि नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट सारख्या लहान बचत योजना सुरू केल्या आहेत. आज लाखो भारतीय नागरिक या योजनांचा लाभ घेत आहेत. तुम्ही देखील या योजनांचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही येत्या 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत आधार कार्ड जमा केलं नाही तर या बचत योजनेचं अकाउंट गोठवलं जाणार आहे. आधार कार्ड दिल्यानंतर हे अकाउंट पुन्हा सक्रिय केलं जाईल. संबंधित मंत्रालयाने या संदर्भात 31 मार्च 2023 ला नोटिफिकेशन जारी केलं होतं. `नवभारत टाइम्स`ने याविषयीचे वृत्त दिले आहे.
पीपीएफ, सीनिअर सिटीझन्स सेव्हिंग्ज स्कीम आणि नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटसारख्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेत सहभागी असलेल्या लोकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन आपले आधार कार्ड जमा करावे लागणार आहे. जर ही प्रक्रिया केली नाही तर संबंधित व्यक्तीचे अकाउंट गोठवण्यात येणार आहे. आधार कार्ड जमा केल्यावर संबंधित अकाउंट पूर्ववत सुरू होणार आहे.
advertisement
स्मॉल सेव्हिंग्ज स्किमला पोस्ट ऑफिस योजना असंही म्हणतात. यात बचत करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा पैसा सुरक्षित राहतो आणि चांगले व्याजही मिळते. काही योजनांमध्ये कलम 80 सी अंतर्गत करसवलत मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये नऊ बचत योजनांचा समावेश आहे. यात सेव्हिंग्ज अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, टाइम डिपॉझिट अकाउंट, मंथली इन्कम स्कीम अकाउंट, सीनिअर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम अकाउंट, पीपीएफ अकाउंट, नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजनेचा समावेश आहे.
advertisement
दरम्यान, अर्थ मंत्रालयाने पीपीएफ, एनएससी आणि अन्य बचत योजनांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड अनिवार्य केले आहे. सध्या गुंतवणूकदारांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. यासंदर्भात मंत्रालयाने 31 मार्च 2023 रोजी एक नोटिफिकेशन जारी केले होते. या नोटिफिकेशननुसार, एखाद्या व्यक्तीचे या योजनांतर्गत अकाउंट सुरु असेल आणि त्यांनी त्यासंदर्भात आधार क्रमांक संबंधित कार्यालयाला कळवला नसेल तर त्याने तो सहा महिन्यांच्या आता तो कळवणे गरजेचे आहे. हा सहा महिन्यांचा कालावधी 30 सप्टेंबर 2023 ला संपत आहे. त्यामुळे संबंधित अकाउंट होल्डरने तातडाने कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेत बचत करणाऱ्यांनो करा हे काम, अन्यथा फ्रिज होईल अकाउंट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement