Saving Account वर मेंटेन करावं लागतं मिनिमम बॅलेन्स, जाणून घ्या SBI आणि ICICI बँकेचे नियम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Minimum Balance Rule: सेव्हिंग्स अकाउंट्समध्ये एक मिनिमम बॅलेन्स ठेवणे गरजेचे आहे. असे न केल्यास बँक तुमच्यावर दंड लावू शकते. मिनिमम बॅलेन्स ती रक्कम आहे जी प्रत्येकाने आपल्या अकाउंटमध्ये ठेवायला हवी.
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : बँकांमध्ये सामान्यतः 2 प्रकारचे अकाउंट उघडले जातात. एक सेव्हिंग अकाउंट आणि दुसरं करंट अकाउंट. प्रत्येक बँकांची स्वतःची एक वेगळी मिनिमम बॅलेन्स लमिट असते. सेव्हिंग्स अकाउंट उघडल्यावर तुम्ही एक मिनिमम बॅलेन्स मेंटेन केलं नाही तर बँक तुमच्यावर दंड आकारु शकते.
SBI मध्ये मिनिमम बॅलेन्सचे नियम
मार्च 2022 मध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या बेसिक सेव्हिंग्स अकाउंटवर अॅव्हरेज मंथली बॅलेन्सला काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी, एसबीआय खातेधारकांना त्यांच्या अकाउंटमध्ये सरासरी मासिक 3,000 रुपये, 2,000 रुपये किंवा 1,000 रुपये बॅलेन्स ठेवावे लागत होते. त्यांच्या ब्रांचनुसार हा रिशोब राखावा लागत होता.
advertisement
ICICI बँकेत मिनिमम बॅलेन्सचे नियम
ICICI बँकेतील रेग्युलर सेव्हिंग्स अकाउंटसाठी अॅव्हरेज मिनिमम बॅलेन्स 10,000 रुपये आणि सेमी अर्बन ब्रांचसाठी 5,000 रुपये आणि ग्रामीण भागातील ब्रांचसाठी मिनिमम सेव्हिंग्स अकाउंट बॅलेन्स क्रायटेरिया 2,000 रुपये आहे.
advertisement
झिरो बॅलेन्स अकाउंट म्हणजे काय?
अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना झिरो बॅलेन्स बँक अकाउंटची सुविधा देतात. यामध्ये यूझर्सला मिनिमम बॅलेन्स मेंटेन करण्याची गरज नाही. अशा अकाउंट्समध्ये सामान्यतः विनामूल्य व्यवहार आणि पैसे काढण्याची मासिक मर्यादा असते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2023 11:45 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Saving Account वर मेंटेन करावं लागतं मिनिमम बॅलेन्स, जाणून घ्या SBI आणि ICICI बँकेचे नियम