एलआयसी म्युच्युअल फंड 20 एप्रिल 1989 रोजी सुरू झाला होता. 20 एप्रिल 1994 रोजी त्याचे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झालं होतं. एलआयसी म्युच्युअल फंड प्रायव्हेट लिमिटेड असे ट्रस्टी संस्थेचे नाव आहे. सध्या एलआयसीकडे 15 फंड आहेत. त्यामध्ये एलआयसी एमएफ इन्फ्रास्ट्रक्चर फंड, एलआयसी एमएफ निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड, एलआयसी एमएफ गोल्ड ईटीएफ एफओएफ फंड, एलआयसी एमएफ लार्ज अँड मिडकॅप फंड, एलआयसी एमएफ फ्लेक्सी कॅप फंड, एलआयसी एमएफ फोकस्ड 30 इक्विटी फंड, एलआयसी एमएफ फोकस्ड फंड, एलआयसी एमएफ लार्ज कॅप फंड यांचा समावेश होतो.
advertisement
एलआयसी म्युच्युअल फंड 30170.82 कोटी रुपयांच्या निधीसह कार्य करत आहे. एलआयसी म्युच्युअल फंडामध्ये जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांच्या गरजा लक्षात घेऊन जवळपास 26 वेगवेगळ्या योजना ऑफर केल्या जात आहेत. भारतीय शेअर मार्केटमध्ये या फंडांची 90.06 टक्के गुंतवणूक आहे. त्यापैकी 87.62 टक्के लार्ज-कॅप शेअर्समध्ये आणि 2.43 टक्के मिड-कॅप शेअर्समध्ये आहे.
SIP Investment: 2000, 3000 की 5000 SIP मध्ये किती पैसे लावले तर 1,00,00,000 मिळतील?
एलआयसी एएमसीने गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये 14.56 टक्क्यांचा सीएजीआर नोंदवला आहे. त्यामुळे तो गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक पसंतीचा लार्ज अँड मिड-कॅप म्युच्युअल फंड बनला आहे. ग्राहक एलआयसी एमएफ टॅक्स प्लॅनमधूनही कर सवलत घेऊ शकतात. हे दोन्ही ईएलएसएस आधारित गुंतवणूक पर्याय आहेत.
तुम्हाला एलआयसीच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल, तर सुमारे 30 वर्षांसाठी दरमहा पाच हजार रुपये गुंतवावे लागतील. म्युच्युअल गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याजाने दरवर्षी सुमारे 12 टक्के परतावा मिळतो. दरमहा पाच रुपये जमा केल्यास एका वर्षात 60 हजार आणि 30 वर्षांत 18 लाख रुपये होतील. दरवर्षी 12 टक्के दराने तुम्हाला 30 वर्षांमध्ये सुमारे 1,58,49,569 रुपये परतावा मिळेल. तुमची एकूण गुंतवणूक आणि मिळणारा परतावा एकत्र केल्यास तुम्हाला 1,76,49,569 रुपये मिळतील.
एलआयसी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी म्युच्युअल फंड एक्सपर्टचा सल्ला घ्यावा. गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला वैयक्तिक ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड इत्यादींची गरज भासेल. याशिवाय पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशन कार्ड किंवा वीज बिलाची प्रत द्यावी लागेल. आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर गुंतवणूकदार आवडीचा गुंतवणूक कालावधी निवडू शकतो. जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूक योजनांची निवड करणे देखील महत्त्वाचे आहे. गुंतवणूकदाराला एसआयपी सुरू करण्याचा पर्याय दिला जाईल. अशा प्रकारे तुम्ही एलआयसी म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता.