SIP Investment: 2000, 3000 की 5000 SIP मध्ये किती पैसे लावले तर 1,00,00,000 मिळतील?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
SIP Investment: एसआयपी योजनेत महिन्याला दोन हजार गुंतवणूक केल्यास तुम्ही करोडपती होण्यास किती वर्षं लागतील? जाणून घ्या
मुंबई : आर्थिक गुंतवणूक करताना अनेकजण जास्त रिटर्न आणि सुरक्षित योजना निवडण्यास प्राधान्य देतात. त्यातच आजकाल एसआयपी गुंतवणूक योजना म्हणजेच सिस्टिमॅटिक इंव्हेस्टमेंट प्लॅन खूपच लोकप्रिय होत आहे. म्युच्युअल फंडमध्ये पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्याचा हा उत्तम मार्ग आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या योजनेत तुम्ही प्रतिमहिना दोन हजार, तीन हजार किंवा पाच हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला एक करोड रुपये रिटर्न मिळण्यासाठी किती वर्षं लागू शकतात? याबाबतच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ‘इंडिया टीव्ही’ने याबाबत वृत्त दिलंय.
लहान गुंतवणूकदारांमध्ये एसआयपी अधिक लोकप्रिय होत आहे. याचे कारण म्हणजे कमी पैशांची गुंतवणूक केल्यानंतर बंपर रिटर्न मिळू शकतात. त्यामुळे एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. चला तर, जर तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा दोन हजार, तीन हजार किंवा पाच हजार रुपये गुंतवले तर किती वर्षात तुमच्याकडे एक कोटी रुपये जमा होतील? हे जाणून घेऊ.
advertisement
महिन्याला पाच हजार रुपये गुंतवणूक
जर तुम्ही एसआयपीमध्ये महिन्याला पाच हजार रुपये गुंतवणूक केल्यास तुमची 22 वर्षांत एकूण गुंतवणूक 13,20,000 रुपये होईल. या गुंतवणुकीवर तुम्हाला 15 टक्के दराने 90,33,295 रुपये रिटर्न मिळतील. याचाच अर्थ तुम्हाला 22 वर्षानंतर अंदाजे एकूण रक्कम 1,03,53,295 रुपये मिळतील.
महिन्याला तीन हजार रुपये गुंतवणूक
एसआयपी योजनेत महिन्याला तीन हजार रुपये गुंतवणूक केल्यास तुमची 26 वर्षात एकूण गुंतवणूक 9,36,000 रुपये होईल. या रक्कमेवर तुम्हाला 15 टक्के दराने 1,05,39,074 रुपये रिटर्न मिळती. याचाच अर्थ तुम्हाला 26 वर्षानंतर अंदाजे एकूण रक्कम 1,14,75,074 रुपये मिळतील.
advertisement
महिन्याला दोन हजार रुपये गुंतवणूक
जर तुम्ही एसआयपीमध्ये महिन्याला दोन हजार रुपये गुंतवणूक केल्यास तुमची 28 वर्षात एकूण गुंतवणूक 6,72,000 रुपये होईल. या गुंतवणुकीवर तुम्हाला 15 टक्के दराने 96,91,573 रुपये रिटर्न मिळतील. याचाच अर्थ तुम्हाला 28 वर्षानंतर अंदाजे एकूण रक्कम 1,03,63,573 रुपये मिळतील.
दरम्यान, एसआयपी योजनेत गुंतवणूक करताना तुम्ही योग्य नियोजन केल्यास कमी कालावधीत तुम्ही करोडपती होऊ शकता. या योजनेत गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. त्यामुळेच ही योजना दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2024 7:48 AM IST
मराठी बातम्या/मनी/
SIP Investment: 2000, 3000 की 5000 SIP मध्ये किती पैसे लावले तर 1,00,00,000 मिळतील?