TRENDING:

Success Story : दिवाळी फराळातून 30 महिलांना दिला रोजगार, 10 दिवसांत 60 लाखांची उलाढाल, ज्योती यांची यशोगाथा

Last Updated:

ज्योती कवर या गेल्या 20 वर्षांपासून दिवाळीचे फराळ विक्रीचा व्यवसाय करत आहेत. फराळ विक्रीतून दिवाळीच्या 10 दिवसांत 60 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे त्यांनी सांगितले.

advertisement
छत्रपती संभाजीनगर : येथील ज्योती कवर या गेल्या 20 वर्षांपासून दिवाळीचे फराळ विक्रीचा व्यवसाय करत आहेत. घरगुती फराळामध्ये भडंग चिवडा, चिरोटे, तळलेला चिवडा, करंजी, अनारसे, शंकरपाळे यासह विविध खाद्यपदार्थांचे वेगवेगळे प्रकार येथे उपलब्ध आहेत. यातून जवळपास चिवडा 3 ते 4 क्विंटल, मसाला शेव 3 क्विंटल, शंकरपाळे 2 क्विंटल लागतात. या ठिकाणी 30 महिला काम करतात त्यांना देखील रोजगार मिळाल्याने त्या समाधान व्यक्त करत आहेत. फराळ विक्रीतून दिवाळीच्या 10 दिवसांत 60 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे कवर यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement

दिवाळीच्या फराळाचे चिवडा असो, किंवा लाडू, मसाला शेव, शंकरपाळे या सर्व पदार्थांचे क्विंटल प्रमाणे महिलांना कॉन्ट्रॅक्ट दिले जाते. सर्व पदार्थ महिलांकडून स्वतःच्या निगराणीखाली तयार करून घेतले जातात, त्यामुळे पदार्थाची चव आणि दर्जा कळतो नंतर पॅकिंग होते. पारंपारिक आणि घरगुती सर्व फराळ ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध केले जाते. दर्जेदार पदार्थांमुळे गेल्या वीस वर्षांपासून ग्राहक आमच्या सोबत जोडले गेले असल्याचे देखील कवर यांनी म्हटले आहे.

advertisement

Success Story : शिक्षणात नाही लागले मन, तरुणाने सुरू केलं मटण भाकरी सेंटर, महिन्याला 4 लाखाची उलाढाल

महिलांनी व्यवसाय कसा सुरू करावा?

महिलांना खाण्याच्या पदार्थाचा व्यवसाय करताना जास्त काही भांडवल लागत नाही, कारण की तुमच्या घरामध्येच किराणा आणि गॅस असतो. तुम्ही तुमच्या घरून देखील एक किंवा दोन किलोपासून सुरुवात केली आणि वेळेनुसार चव वाढत गेली आणि दर्जेदार होत गेली तर त्याच पद्धतीने ग्राहक पदार्थ खरेदीसाठी तुमचे घर आणि पत्ता शोधत येतात. त्यामुळे महिलांनी जास्त घाबरून न जाता व्यवसायाला जास्त भांडवल लागते किंवा दुकानच घ्यावे लागते असे मनात न आणता घरातून सुरुवात करावी व नंतरच्या काळात त्याचे स्वरूप बदलत जाते व त्याचे फळ येत्या काळात नक्कीच मिळते.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Success Story : दिवाळी फराळातून 30 महिलांना दिला रोजगार, 10 दिवसांत 60 लाखांची उलाढाल, ज्योती यांची यशोगाथा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल