TRENDING:

Share Marketमधील सीक्रेट पोर्टफोलिओ लीक, 2 ते 11 रुपयांचे शेअर्स; चुकवलंत तर पश्चाताप होईल

Last Updated:

Penny Stocks: देशातील सर्वात मोठी गुंतवणूकदार संस्था एलआयसीने पुन्हा एकदा बाजारात हलचल माजवली आहे. विमा दिग्गजाने अशा 10 पेनी स्टॉक्समध्ये हिस्सा घेतला आहे ज्यांच्या किंमती कमी असल्या तरी भविष्यात मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: भारतातील सर्वात मोठी गुंतवणूकदार संस्था एलआयसी (Life Insurance Corporation of India) च्या गुंतवणुकीचं पोर्टफोलिओ म्हणजे अक्षरशः एक महासागर आहे. ज्यात लार्जकॅप, मिडकॅप दिग्गज कंपन्यांपासून ते पेनी स्टॉक्सपर्यंत अनेक शेअर्सचा समावेश आहे. या पेनी स्टॉक्स म्हणजे अशा कंपन्या ज्या सध्या अतिशय कमी किमतीवर ट्रेड होत आहेत. पण भविष्यात त्यांच्यात वाढीची शक्यता एलआयसीला दिसते. अर्थात या कंपन्यांमध्ये जोखीमही तितकीच मोठी आहे. एलआयसीच्या पोर्टफोलिओमधील अशाच 10 पेनी स्टॉक्सची यादी पाहू, ज्यात या विमा दिग्गजाची भागीदारी आहे.

advertisement

1. GTL Infra टेलिकॉम एनर्जी सर्व्हिस प्रोव्हायडर

एलआयसीची हिस्सेदारी: 2.97% म्हणजेच सुमारे 40 कोटी शेअर्स

शेअर किंमत: 1.47

मार्केट कॅप: 1,870 कोटी

52 आठवड्यांचा उच्चांक 2.49 आणि नीचांक 1.28

advertisement

2004 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर आणि एनर्जी मॅनेजमेंट क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या पाच वर्षांत विक्री वाढ कमकुवत राहिली आहे आणि प्रमोटर होल्डिंग केवळ 3.28% आहे.

2. JP Associates एकेकाळी दिग्गज, आता पेनी स्टॉक

advertisement

एलआयसीची हिस्सेदारी: 1.09%

शेअर किंमत: 3

कधीकाळी रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील मोठं नाव असलेली जयप्रकाश असोसिएट्स आता पेनी स्टॉकमध्ये गणली जाते. अलीकडेच वेदांता लिमिटेड कंपनी ही संस्था 17,000 कोटींना खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे.

advertisement

3. EaseMyTrip ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी

एलआयसीची हिस्सेदारी: 2.30%

शेअर किंमत: 8

मार्केट कॅप: 2,942 कोटी

52 आठवड्यांचा उच्चांक 19 आणि नीचांक 7.82

ही देशातील प्रमुख ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्यांपैकी एक असून MakeMyTrip ला टक्कर देते. ऑगस्ट 2025 मध्ये कंपनीचा नफा घटल्याने शेअरवर दबाव आला होता.

4. FGP Ltd फायबरग्लासपासून प्रॉपर्टी रेंटलपर्यंत

एलआयसीची हिस्सेदारी: 3.09%

शेअर किंमत: 9.77

मार्केट कॅप: 11.5 कोटी

52 आठवड्यांचा उच्चांक 13.70 आणि नीचांक 7.32

पूर्वी ही कंपनी फायबरग्लास उत्पादनात होती. परंतु आता ती बिझनेस सेंटर डेव्हलपमेंट आणि प्रॉपर्टी रेंटल व्यवसायात कार्यरत आहे.

5. HLV Ltd हॉटेल लीला व्हेंचर्स

एलआयसीची हिस्सेदारी: 1.37%

शेअर किंमत: 11

मार्केट कॅप: 738 कोटी

52 आठवड्यांचा उच्चांक 21.75 आणि नीचांक 10.86

ही कंपनी देशातील प्रसिद्ध लक्झरी हॉटेल चेनलीला’चा मालकी आणि संचालन व्यवसाय करते.

6. Mysore Paper Mills ठप्प झालेला व्यवसाय

एलआयसीची हिस्सेदारी: 2.73%

शेअर किंमत: 7.42

मार्केट कॅप: 88.22 कोटी

ही कंपनी दंडात्मक कारवाईमुळे ट्रेडिंगपासून निलंबित आहे. एकेकाळी पेपर उत्पादन करणारी ही कंपनी सध्या बंद आहे.

7. Premier Ltd सोलर एनर्जीशी निगडित कंपनी

एलआयसीची हिस्सेदारी: 5.65%

शेअर किंमत: 3.60

मार्केट कॅप: 10.93 कोटी

ही कंपनी सोलर सेल आणि मॉड्यूल्सच्या उत्पादनात तज्ज्ञ आहे.

8. JBF Industries पॉलिस्टर उत्पादन करणारी कंपनी

एलआयसीची हिस्सेदारी: 2.47%

शेअर किंमत: 4.30

मार्केट कॅप: 36 कोटी

1982 पासून कार्यरत असलेली ही कंपनी पॉलिस्टर चिप्स आणि यार्न तयार करते.

9. Millennium Online Solutions ऑनलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस

एलआयसीची हिस्सेदारी: 2.66%

शेअर किंमत: 1.94

मार्केट कॅप: 9.7 कोटी

2000 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी ऑनलाइन वित्तीय समाधान सेवा (Financial Solutions) पुरवते.

10. Vakrangee एकेकाळचा मल्टिबॅगर, आता पेनी स्टॉक

एलआयसीची हिस्सेदारी: 4.41%

शेअर किंमत: 8

मार्केट कॅप: 891 कोटी

52 आठवड्यांचा उच्चांक 38.20 आणि नीचांक 7.99

कंपनी ई-कॉमर्स, बुलियन आणि फायनान्शियल सर्व्हिसेस क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र शेअरने गेल्या काळात मोठी घसरण अनुभवली आहे.

Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.

मराठी बातम्या/मनी/
Share Marketमधील सीक्रेट पोर्टफोलिओ लीक, 2 ते 11 रुपयांचे शेअर्स; चुकवलंत तर पश्चाताप होईल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल