दरम्यान हेलिओस कॅपिटलचे संस्थापक समीर अरोरा यांनी गुंतवणूकदारांना दिलासा देणारे वक्तव्य केले आहे. त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, पुढील 1-2 महिन्यांत बाजार बॉटम आउट (तळ गाठेल) करेल, म्हणजेच ज्या प्रमाणात बाजार घसरायचा आहे, ती घसरण पूर्ण होईल. त्यानंतर 5-10% ची तेजी येईल. मात्र त्यांनी हेही स्पष्ट केले की, या वाढीनंतरही बाजार तिथेच राहील जिथून बुल मार्केटची सुरुवात झाली होती. सामान्यतः बुल मार्केटची सुरुवात 2020 पासून मानली जाते.
advertisement
शेअर बाजारातील ATM मशीन, आयुष्यभर पैसा छापाल; ११ मार्चआधी खरेदी हा शेअर करा
गेल्या आठवड्यात सलग 10 दिवस शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता. गेल्या वर्षाच्या शेवटापासून शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड सुरू आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत आणि बाजार पुन्हा केव्हा सावरतो, याची वाट पाहत आहेत.
शंकर शर्मांचे वेगळे मत - बाजार सावरण्यास 4-5 वर्षे लागू शकतात
समीर अरोरा यांच्या या अंदाजाशी सगळेच सहमत नाहीत. जीक्वांट इन्वेस्टेकचे संस्थापक आणि बाजारातील मोठे तज्ज्ञ शंकर शर्मा यांनी मात्र वेगळे मत मांडले आहे. त्यांच्या मते, बाजार सध्या मोठ्या मंदीच्या फेजमध्ये असून, ही घसरण थांबायला अजून 4-5 वर्षे लागू शकतात.
शंकर शर्मा यांच्या मते, सप्टेंबर 2024 पासून बाजारात सुरू झालेला नकारात्मक परताव्याचा ट्रेंड पुढील 4-5 वर्षे सुरू राहू शकतो. त्यांचा अंदाज आहे की, बाजार मोठ्या प्रमाणात वाढण्याऐवजी दीर्घकाळ कमी परतावा देत राहील.
शेअर बाजारात विनाशकाळ, पैसा लावणे मोठी चूक; गुंतवणूकदाराने केली भविष्यवाणी
ते म्हणाले, या काळात बाजार फारसा बदल होणार नाही. काही खराब आर्थिक डेटा किंवा नकारात्मक परिस्थितीमुळे सेन्सेक्स 73,000 वरून 60,000 पर्यंत खाली जाऊ शकतो आणि नंतर पुन्हा 75,000 पर्यंत पोहोचेल. त्यामुळे पुढील 5 वर्षे गुंतवणूकदारांना बाजाराबाबत रस वाटेल, पण मोठे परतावे मात्र मिळणार नाहीत.
डॉलरच्या तुलनेत भारतीय बाजाराचा परतावा नकारात्मक?
शंकर शर्मा यांच्या मते, पुढील काही वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजार डॉलरच्या तुलनेत नकारात्मक परतावा देऊ शकतो. म्हणजेच, बाजार वाढला तरीही तो महागाई आणि डॉलरच्या मूल्यानुसार कमजोर राहील. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतीय शेअर बाजार कमी आकर्षक ठरू शकतो.
जबरदस्त Jackpot, 1 लाखाचे झाले 1.31 कोटी; Multibagger Stock आहे तरी कोणता
गुंतवणूकदारांनी काय करावे?
या वेगवेगळ्या मतांमुळे गुंतवणूकदार संभ्रमात असतील. समीर अरोरा यांच्या अंदाजानुसार, बाजार लवकरच स्थिर होऊन 5-10% ची तेजी दाखवू शकतो. तर शंकर शर्मा यांच्या मते, बाजार लवकर सावरणार नाही आणि दीर्घकाळ मंदीत राहील.
गुंतवणूकदारांनी यावेळी दीर्घकालीन विचार करूनच निर्णय घ्यावेत. बाजारातील अस्थिरतेचा सामना करण्यासाठी मजबूत कंपन्यांचे शेअर्स आणि चांगले फंड निवडून गुंतवणूक करावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.