TRENDING:

Massive Layoff: पगार देण्यास पैसे नाहीत, 2400 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; महाभयंकर स्थिती, हजारो संसार उघड्यावर

Last Updated:

Massive Layoff: जागतिक आरोग्य संघटना गंभीर आर्थिक तुटीच्या फटक्यात सापडली असून पुढील वर्षभरात तब्बल 25% कर्मचारी कपात करणार आहे. अमेरिकेच्या निधी थांबवण्यामुळे WHO समोर अस्तित्वाचा सर्वात मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई/जिनेव्हा: रॉयटर्सच्या अहवालानुसार जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या कर्मचारी संख्येत मोठ्या प्रमाणात कपात करण्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत संघटनेचे जागतिक मनुष्यबळ (Workforce) जवळपास एक चतुर्थांश म्हणजेच 25 टक्क्यांनी कमी होणार आहे.

आकडेवारीनुसार जानेवारी 2025 मध्ये WHO कडे एकूण 9,401कर्मचारी होते, परंतु आता जून 2026 पर्यंत यातील 2,371 पदे कमी केली जाणार आहेत. हा निर्णय प्रामुख्याने अमेरिकन सरकारने विशेषतः डोनल्ड ट्रम्प प्रशासनाने WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे घेण्यात आला आहे. अमेरिका ही संघटनेला आर्थिक मदत करणारा सर्वात मोठा देश होती आणि ती WHO च्या एकूण अर्थसंकल्पाचा सुमारे 18 टक्के हिस्सा देत असे. अमेरिकेच्या या बाहेर पडण्यामुळे आणि निधी थांबल्यामुळे संघटनेच्या कामावर आणि रचनेवर थेट आणि गंभीर परिणाम झाला आहे.

advertisement

या कपातीचा फटका केवळ कनिष्ठ स्तरावरच नाही, तर वरिष्ठ व्यवस्थापनालाही बसला आहे. उपलब्ध माहितीनुसार, WHO ची मॅनेजमेंट टीम आता निम्म्यावर आली आहे. संघटनेने सदस्य देशांना दिलेल्या सादरीकरणानुसार ही कपात केवळ कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नाही; मोठ्या संख्येने तात्पुरते कर्मचारी आणि सल्लागारांना (Consultants) यापूर्वीच कामावरून कमी करण्यात आले आहे.

advertisement

एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार काही पदे भविष्यात रिक्तच ठेवली जातील. ज्यामुळे संघटनेचे एकूण मनुष्यबळ 22 टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका भावुक संदेशात म्हटले की, हे वर्ष संघटनेच्या इतिहासातील सर्वात कठीण वर्षांपैकी एक राहिले आहे. संघटनेच्या कामाला आणि संसाधनांना नवीन आकार देण्यासाठी हे पाऊल उचलणे 'वेदनादायी असले तरी आवश्यक' असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

advertisement

सद्यस्थितीत संघटनेसमोर आर्थिक बजेटचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. 2026-2027 च्या अर्थसंकल्पात 1.06 अब्ज डॉलर्सची तूट निर्माण झाली आहे, जी एकूण बजेटच्या जवळपास एक चतुर्थांश आहे. दिलासादायक बाब म्हणजे मे महिन्यात ही तूट 1.7 अब्ज डॉलर्स इतकी असेल असा अंदाज होता, जो आता काहीसा कमी झाला आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सादर केलेल्या कागदपत्रांनुसार सुमारे १.१ अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त निधीसाठी विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. एकूणच जागतिक आरोग्य संघटना सध्या आपल्या अस्तित्वासाठी आणि कार्यक्षमतेसाठी एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Massive Layoff: पगार देण्यास पैसे नाहीत, 2400 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; महाभयंकर स्थिती, हजारो संसार उघड्यावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल