TRENDING:

तुम्हाला कशाला Job Security, सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा 5 पट जास्त कमावता; नोकर कपातीच्या भूकंपावर Google इंजिनिअरचा सवाल

Last Updated:

Layoffs News: अमेरिकेतील मायक्रोसॉफ्टमध्ये झालेल्या मोठ्या नोकरकपातीच्या पार्श्वभूमीवर, बंगळूरुस्थित Google च्या एका अभियंत्याने सरकारी नोकरीच्या कथित स्थिरतेवर जोरदार सवाल उपस्थित केला आहे. उच्च पगाराच्या संधी असताना केवळ नोकरीच्या सुरक्षेचा विचार करणे योग्य आहे का, असा थेट प्रश्न त्यांनी विचारला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर एक नवीन चर्चा सुरू झाली आहे.

advertisement
बेंगळूरु: अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट कंपनीने नुकतीच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली. यावर एका महिलेने ट्विटरवर (आताचे एक्स) प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ज्यात तिने सरकारी नोकरीतील स्थिरतेचे महत्त्व सांगितले होते. या ट्विटला बंगळूरुस्थित आणि Google मध्ये कार्यरत असलेल्या एका अभियंत्याने प्रत्युत्तर दिले आहे. ज्यामुळे नोकरीची सुरक्षा आणि उच्च पगारावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
News18
News18
advertisement

स्नेहा नावाच्या एका महिलेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते, माझा चुलत भाऊ अमेरिकेत मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत होता. त्याला आता नोकरीवरून काढले आहे. टेक क्षेत्र स्थिर नाही. म्हणूनच पालक सरकारी नोकरीची तयारी करायला सांगतात. निदान तिथे नोकरीची सुरक्षा तरी असते.

या ट्विटला उत्तर देताना राहुल राणा नावाच्या बेंगळूरुच्या अभियंत्याने लिहिले, जेव्हा तुम्ही काही वर्षांत सरकारी कर्मचाऱ्याच्या संपूर्ण आयुष्यातील कमाईच्या 5 पट जास्त कमवू शकता. तेव्हा तुम्हाला नोकरीच्या सुरक्षेची गरज काय?

advertisement

यापूर्वी राहुल राणा यांनी मायक्रोसॉफ्टमधील नोकरकपातीमुळे ज्यांनी नोकरी गमावली, त्यांना पाठिंबा दिला होता. बुधवारी त्यांनी पोस्ट केले होते, मायक्रोसॉफ्टमधील नुकत्याच झालेल्या नोकरकपातीमुळे प्रभावित झालेल्या सर्व हुशार लोकांसाठी शुभेच्छा. कठीण काळ आहे. पण नवीन दरवाजे उघडतील. जर तुम्हाला रेफरलची गरज असेल. तर तुमचा बायोडाटा, नाव, ईमेल आणि फोन नंबर मला DM करा. जिथे शक्य असेल तिथे मदत करण्यास आनंद होईल.

advertisement

मायक्रोसॉफ्टमधील नोकरकपात काय आहे?

एपीच्या वृत्तानुसार मायक्रोसॉफ्टने मंगळवारी सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात करण्यास सुरुवात केली आहे. ही कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 3% आहे आणि गेल्या दोन वर्षांतील सर्वात मोठी नोकरकपात आहे. कंपनी मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

या नोकरकपातीचा मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यालय असलेल्या वॉशिंग्टन राज्याला मोठा फटका बसला आहे. कंपनीने राज्य अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे की रेडमंड मुख्यालयातील 1,985 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. ज्यात सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग आणि प्रॉडक्ट मॅनेजमेंटमधील अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

advertisement

मायक्रोसॉफ्टने सांगितले की ही नोकरकपात सर्व स्तरांवर, टीम्समध्ये आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये असेल. परंतु व्यवस्थापकांच्या संख्येत घट करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. कर्मचाऱ्यांना मंगळवारपासून नोटीस पाठवण्यास सुरुवात झाली आहे.

ही मोठी नोकरकपात अशा वेळी झाली आहे. जेव्हा काही आठवड्यांपूर्वीच मायक्रोसॉफ्टने जानेवारी-मार्च तिमाहीतील मजबूत विक्री आणि नफ्याचे आकडे जाहीर केले होते. जे वॉल स्ट्रीटच्या अपेक्षेपेक्षा जास्त होते. यामुळे अस्थिर असलेल्या टेक सेक्टर आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला होता.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
तुम्हाला कशाला Job Security, सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा 5 पट जास्त कमावता; नोकर कपातीच्या भूकंपावर Google इंजिनिअरचा सवाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल