सोलापूर शहरातील मंगळवार पेठेत राहणाऱ्या पिंकी कुमावत यांचे शिक्षण MBA फायनान्सपर्यंत झाले आहे. पिंकी कुमावत ही मूळची राजस्थानची रहिवासी आहे. पिंकी यांचे वडील 25 वर्षांपूर्वी सोलापुरात आले आणि स्वतःचा केटरिंगचा व्यवसाय सुरू केला. गेल्या 25 वर्षांपासून पिंकी यांचे वडील सोलापूर शहरात केटरिंगचा व्यवसाय चालवत आहेत. तर फक्त दिवाळीमध्ये ग्राहकांनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणे फराळ बनवण्याचं काम पिंकी कुमावत करत आहेत.
advertisement
MPSC परिक्षेत अपयश, आले शेतीने पालटलं तरुणाचं नशीब, 2 एकरात घेतलं 15 लाखांचं उत्पन्न
गेल्या 20 वर्षांपासून उच्चशिक्षित तरुणी पिंकी कुमावत ही फराळ बनवते. त्यानंतर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची सर्व जबाबदारी पिंकी कुमावत यांच्यावरच आहे. दिवाळी सणात ज्याप्रमाणे घरात फराळ तयार केला जातो, त्याचप्रमाणे येथे फराळ तयार केला जातो. सोलापूर शहरासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथे सुद्धा फराळ उत्तमरीत्या पॅकिंग करून ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात.
नमकीन फराळाची किंमत 260 ते 300 रुपये किलोपर्यंत आहे. तर स्वीट मिठाईची किंमत 840 रुपयांपासून ते 1100 रुपये किलोपर्यंत किंमत आहे. दिवाळी सणाच्या वीस दिवसा अगोदरपासून फराळ तयार करण्याची सुरुवात केली जाते आणि ग्राहकांपर्यंत दिवाळीच्या दोन ते तीन दिवसांत फराळ घरपोच केला जातो.
पिंकी कुमावत बनवत असलेल्या फराळाची गुणवत्ता आणि चव ही विशेष असल्याने फराळाला मागणी देखील आहे. या उपक्रमामुळे उच्चशिक्षित तरुणींना रोजगाराची संधी निर्माण झाली असून, पारंपरिक खाद्य संस्कृतीला देखील चालना मिळाली आहे. तर या 20 दिवसांमध्ये फराळ विक्रीतून आठ ते दहा लाख रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती उच्चशिक्षित तरुणी पिंकी कुमावत यांनी दिली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला उच्चशिक्षित तरुणीचा फराळ व्यवसाय यशस्वी ठरला आहे.