केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विनंतीवरून 65 वर्षीय मेहुल चोक्सीला शनिवारी अटक करण्यात आली आणि तो सध्या तुरुंगात आहे, असे इकॉनॉमिक टाईम्सने वृत्त दिले आहे.
पोलिसांनी चोक्सीला अटक करताना मुंबई न्यायालयाने जारी केलेल्या दोन ओपन-एंडेड अटक वॉरंटचा संदर्भ दिला. ही वॉरंट 23 मे 2018 आणि 15 जून 2021 रोजीची होती, असे वृत्तात म्हटले आहे. मात्र, आरोपी चोक्सी प्रकृती अस्वास्थ्य आणि इतर कारणांमुळे जामीन आणि तात्काळ सुटकेची मागणी करेल असे म्हटले जात आहे.ाा
advertisement
पीएनबीला 13.850 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) त्याचा शोध घेत आहे. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणात त्याचा भाचा नीरव मोदी हा लंडनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारतीय तपास यंत्रणांकडून करण्यात आली आहे.
पीएनबी घोटाळ्यात नाव आल्यानंतर मेहुल चोक्सी हा भारतातून जानेवारी 2018 मध्ये फरार झाला होता. त्यानंतर चोक्सी अँटिग्युआ आणि बारर्म्युडामध्ये दिसला होता. त्यानंतर तो आजारी असल्याचे वृत्त समोर आले. आता उपचारासाठी बेल्जियममध्ये दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पत्नीच्या मदतीने बेल्जियममध्ये आश्रय?
चोक्सीने 15 नोव्हेंबर 2023 रोजी त्याच्या बेल्जियन नागरिक पत्नीच्या मदतीने बेल्जियन 'एफ रेसिडेन्सी कार्ड' मिळवले. चोक्सीने बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना बनावट कागदपत्रे सादर केली आणि त्याच्या नागरिकत्वाबाबतची तथ्ये लपवली, असा दावा एका वृत्तात करण्यात आला आहे. चोक्सीने त्याच्या भारतीय नागरिकत्वाची माहितीही दिली नाही.
